राज्यातील विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! School Student Transport Scheme

By MarathiAlert Team

Updated on:

School Student Transport Scheme : महाराष्ट्र शासनाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा व भत्ता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षणासाठी दूरच्या गावात जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 2025-26 शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अंमलात येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय वाहतूक भत्ता कोणाला मिळणार? School Student Transport Scheme

महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा, 2009 आणि महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क नियम, 2011 अंतर्गत काही विद्यार्थ्यांना हा भत्ता लागू केला आहे.

  1. इयत्ता १ ली ते ५ वी: जर शाळा १ किमीपेक्षा लांब असेल
  2. इयत्ता ६ वी ते ८ वी: जर शाळा ३ किमीपेक्षा लांब असेल
  3. इयत्ता ९ वी व १० वी: जर शाळा ५ किमीपेक्षा लांब असेल

वाहतूक भत्त्यामुळे मुलांना आता शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही. यासाठी आता सरकारने वाहतूक भत्ता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (School Student Transport Scheme)

‘आरटीई’ प्रवेश लॉटरी : दुसरी निवड यादी जाहीर? येथे चेक करा

किती विद्यार्थ्यांना लाभ मिळणार?

  • शासनाने राज्यातील 3,301 वस्तीस्थाने (गावे आणि वस्त्या) या योजनेसाठी निश्चित केली आहेत.
  • 20,022 विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.

ही मदत फक्त अशा भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे, जिथे शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक अंतर अधिक आहे आणि वाहतूक सुविधा उपलब्ध नाहीत.

MHT CET 2025 अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी डायरेक्ट लिंक

कसा मिळणार वाहतूक भत्ता?

शासनाने हा भत्ता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT – Direct Benefit Transfer) जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

NMMS Result : शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी निकाल जाहीर

तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

या निर्णयामुळे काय बदल होणार?

  • विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणे सोपे होईल.
  • गावाकडील व दूरच्या भागातील मुलांचे शिक्षण कायम राहील.
  • शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण (Dropout Rate) कमी होईल.
  • शालेय शिक्षणासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक सेवा उपलब्ध होईल.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

  • तुमच्या गावातील शाळा व विद्यार्थ्यांची स्थिती तपासण्यासाठी गावातील शाळा, तालुका किंवा जिल्हा शिक्षण कार्यालय प्रशासनाशी संपर्क साधा.
  • वाहतूक भत्त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा

सन 2025 वर्षातील सर्व थोर राष्ट्र पुरुष जयंती व राष्ट्रीय दिन – संपूर्ण यादी

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!