RTE Lottery Result PDF Download 2025 26 : बऱ्याच दिवसापासून पालक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, ती म्हणजे RTE लॉटरी ची अंतिम यादी कधी जाहीर होणार, नुकतेच आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025 26 करिता ऑनलाईन सोडत जाहीर झाली आहे. आता निवड झालेल्या पालकांना मॅसेज पाठवण्यात आले आहेत, www.student.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर RTE List जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील 1 लाख 1 हजार 916 बालकांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
Table of Contents
1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर
राज्यभरातून RTE 25 टक्के राखीव जागांसाठी 3 लाख 5 हजार 159 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर दिनांक 14 फेब्रुवारी रोजी RTE 1 Round List जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश अंतर्गत या शाळेत मिळणार प्रवेश
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (RTE Act) मधील कलम १२ (सी) (१) नुसार सन २०२५-२६ या वर्षासाठी दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) यामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
‘आरटीई’ 25% अंतर्गत 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड – प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी?
‘आरटीई’ ची अंतिम निवड यादी जाहीर
‘आरटीई’ अंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पालकांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज (SMS) पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर RTE च्या अधिकृत पोर्टलवर जिल्हानिहाय यादी (RTE Lottery Result PDF Download 2025 26) आता उपलब्ध झाली आहे.
लॉटरीमध्ये एखाद्या बालकांचे निवड यादीत नाव असेल, मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोबाईलवर एसएमएस पोहोचू शकला नसेल यासाठी पालकांनी स्वतः आरटीई च्या पोर्टलवर जाऊन लॉगिन करून ऍडमिट कार्ड (Admit Card) या सेक्शन मध्ये जाऊन स्वतः खात्री करून घेणे आवश्यक आहे.
‘आरटीई’ 25% प्रवेशासाठी शेवटची संधी! आता प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी मिळणार
RTE Application Wise Details – आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती येथे चेक करा
Application Wise Details – अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)

तिथे HOME पेजवर – Application Wise Details – अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा

आता Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती चेक करा.
अर्जाची स्थिती मध्ये Priority Number म्हणजे काय?
Priority Number : प्राधान्य क्रमांक म्हणजे RTE Wating List यादीत नाव असणे. अर्जाची स्थिती येथे चेक केल्यानंतर Priority Number दिसत असेल तर तो अर्ज क्रमांक हा वेटिंग नंबर आहे.
RTE च्या दुसऱ्या यादीत त्या क्रमांकानुसार जागा रिक्त राहिल्यास नंबर प्रमाणे मेसेज येईल यासाठी RTE च्या राऊंड वर लक्ष ठेवावे लागेल, यासाठी या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
RTE Official Website – आरटीई अधिकृत वेबसाईट
RTE Official Website ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
How to Check Maharashtra RTE Admission Result 2025
Step 1: www.student.maharashtra.gov.in ला भेट द्या.
Step 2: आरटीई प्रवेश (student.maharashtra.gov.in rte portal login) वर क्लिक करा, त्यानंतर तिथे Selected मूळ निवड यादी (RTE Lottery Result PDF Download 2025 26) वर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडा आणि RTE लिस्ट डाउनलोड करा.
Step 3: लॉगिन करून चेक करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login येथे तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आवश्यक इतर तपशील प्रविष्ट करा
Step 4: RTE Lottery Result PDF Download 2025 26 निकाल पहा.
RTE Admission Lottery Selection List Download Here
आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित; या मानवी दिनांकावर ठरणार वयोमार्यादा
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी महत्वाच्या सूचना
- ‘आरटीई’ २५ टक्के लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
- या समितीमार्फत कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करण्यात येईल.
- तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला अशी नोंद करण्यात येऊन पालकांकडून हमीपत्र भरुन घेण्यात येईल.
- काही पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात येतील.
- यासाठी बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा. तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
- विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
- खोटी / चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी / चुकीची माहिती भरुन दिशाभूल केल्या प्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
प्रतीक्षा यादीतील पालकांसाठी सूचना
- आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पहिल्या यादीत 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, 85 हजार 406 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत (RTE Wating List) मध्ये आहेत.
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी ‘अर्जाची स्थिती’ टॅबमध्ये आपला अर्ज क्रमांक टाकून आपला नंबर तपासावा.
- निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले जातील.
RTE Lottery Result PDF Download 2025 26 निवड यादीतील (List No. 1) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत: १४ फेब्रुवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५
‘आरटीई’ अंतर्गत निवड यादीतील मुलांचे प्रवेशपत्र उपलब्ध, डाऊनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक RTE Admit Card Download 2025-26
RTE पोर्टल वर लॉटरीची अंतिम यादी सोडत जाहीर करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पालकांना डाउनलोड करता येणार आहे, ‘आरटीई’ प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील स्टेप Follow करा.
- सर्वप्रथम RTE पोर्टल https://student.maharashtra.gov.in/ वर जा.
- त्यांनतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तयार केलेला पासवर्ड आणि तुमचा अर्ज क्रमांक टाकून लॉगीन करा त्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या लिंकवर जा.
- त्यांनतर Admit कार्ड या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही RTE Admit Card Download 2025-26 करू शकता.
महत्वाचे – अंतिम यादी सोडत जाहीर होताच RTE साईट वर लोड असल्यामुळे स्लो होऊ शकते, त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा.
अशा प्रकारे तुम्ही प्रवेश पत्र आणि RTE Lottery Result PDF Download 2025 26 डाउनलोड करून घ्या आणि त्यावरील सर्व माहिती बरोबर आहे का? याची खात्री करा, त्यानंतर जे कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना दिलेली होती, ती कागदपत्रे तयार ठेवा.