RTE 25 Admission Last Date : ‘आरटीई’ 25% अंतर्गत 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड – प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी?

Published On: March 16, 2025
Follow Us
RTE 25 Admission Last Date

RTE 25 Admission Last Date : महाराष्ट्र राज्यातील ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२५ २६ राबविण्यात येत आहे. यंदा RTE ची प्रक्रिया लवकर सुरू झाली असून, लॉटरी निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवड झालेल्या मुलांचे प्रवेश निश्चित करण्याची दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ ही शेवटची तारीख होती. मात्र आता यासाठी शिक्षण विभागाने १० मार्च पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता ही मुदतवाढ संपली असून, प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

आरटीई’ अंतर्गत खाजगी नामांकित शाळेत मोफत प्रवेश

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act) अन्वये राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांना ‘आरटीई‘ अंतर्गत खाजगी नामांकित शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2025 26 करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

‘आरटीई’ २५ टक्के अंतर्गत 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड

‘आरटीई’ २५ टक्के अंतर्गत दिनांक 14 फेब्रुवारी २०२५ रोजी RTE 1 Round Lottery List जाहीर करण्यात आली आहे. या प्रवेशासाठी 3 लाख 5 हजार 159 ऑनलाईन अर्ज आले होते.

ऑनलाईन लॉटरी पद्धतीने काढलेल्या सोडतीनुसार 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर 85 हजार 457 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे.

दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत RTE Portal वरील अधिकृत आकडेवारी नुसार 69 हजार 230 बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहे.

RTE लॉटरी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर! येथे चेक करा

केन्द्रीय विद्यालय प्रवेश प्रक्रिया 2025-26 – संपूर्ण माहिती!

RTE Second Round Lottery Listप्रतीक्षा यादीतील मुलांना संधी मिळणार?

RTE च्या पहिल्या यादीतील मुलांचे प्रवेश झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना RTE Second Round Lottery List मध्ये संधी मिळणार आहे. यासाठी खाली दिलेल्या अर्जाची स्थिती चेक करा

RTE Waiting Selections झालेल्या मुलांच्या अर्जाचे स्टेट्स येथे चेक करा – स्टेप बाय स्टेप माहिती

RTE लॉटरी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर! येथे चेक करा

आर.टी.ई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया: अर्ज स्थिती व प्रवेश मार्गदर्शन (2025-26)

आर.टी.ई प्रवेश अर्जाची स्थिती तपासताना काय करावे?
आर.टी.ई 25% अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहताना पोर्टलची गती कमी होऊ शकते. पालकांनी घाबरून न जाता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

RTE 25 Admission Last Date

📢 निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
🗓 प्रवेश घेण्याची अंतिम तारीख (RTE 25 Admission Last Date) : 14 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 (१० मार्च पर्यंत मुदतवाढ संपली)

मोफत शिक्षणासाठी मोठा निर्णय! RTE विद्यार्थ्यांसाठी 200 कोटींची प्रतिपूर्ती

📜 प्रवेश प्रक्रिया:
निवड यादीतील विद्यार्थ्यांचे पालक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन जावीत:
📌 मूळ कागदपत्रे व साक्षांकित प्रति
📌 अलॉटमेंट लेटर (लॉगिन किंवा पडताळणी समितीकडून प्रिंट घ्या)
📌 हमीपत्राची प्रिंट

📩 एसएमएस व पोर्टलवर अर्ज स्थिती कशी तपासावी?
पालकांना मोबाईलवर निवडीचा एसएमएस मिळेल. मात्र, फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आर.टी.ई पोर्टलवरील “अर्ज स्थिती” टॅब वर अर्ज क्रमांक टाकून खात्री करावी.

📌 प्रवेश निश्चित करण्यासाठी काय करावे?
सर्व कागदपत्रांसह पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित करावा.
प्रवेश ऑनलाईन निश्चित झाल्यानंतर पडताळणी समितीकडून रिसीट मिळवणे आवश्यक आहे.

📢 प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी माहिती
📌 प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी “अर्ज स्थिती” टॅब मध्ये अर्ज क्रमांक टाकून आपला नंबर तपासावा.
📌 निवड यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले जातील.

📊 राज्याचा आरटीई प्रवेश आढावा (2025-26)

  • आरटीई २५ टक्के अर्ज केलेले विद्यार्थी : 3,05,152
  • एकूण निवडलेले विद्यार्थी: 1,01,967
  • प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी: 85,457
  • प्रवेश झालेले विद्यार्थी : 69,230

‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची दुसरी यादी कधी? संपूर्ण माहिती

🔗 अधिक माहितीसाठी अधिकृत आरटीई पोर्टलला भेट द्या!

आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित; या मानवी दिनांकावर ठरणार वयोमार्यादा

RTE Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment