RTE Fee Reimbursement Approved: महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम, २००९ (RTE Act 2009) अंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५% आरक्षित कोट्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी २०० कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Table of Contents
आरटीई अंतर्गत शुल्काची प्रतिपूर्ती मंजूर RTE Fee Reimbursement Approved
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकृत शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र सरकारने २०२४-२५ आर्थिक वर्षात आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निधी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत शाळांना देण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत २५% आरक्षित कोट्यातून ऑनलाईन लॉटरीद्वारे प्रवेश घेतला आहे. आणि त्यांचे आधार क्रमांक नोंदणीकृत आहेत. अशा शाळांना सदर निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने आरटीई कायद्यांतर्गत २५% जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी २००००.०० लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे. शाळांसाठी नियम आणि अटी आहेत, अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा.
आरटीई २५% प्रवेश म्हणजे काय?
आरटीई २५% प्रवेश म्हणजे “शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९” (Right to Education – RTE Act, 2009) अंतर्गत दिला जाणारा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क. या कायद्याच्या कलम १२ (१) (C) नुसार, खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी २५% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
RTE लॉटरी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर! येथे चेक करा
आरटीई २५% प्रवेशाचा लाभ कोणाला मिळतो?
खाजगी विनाअनुदानित शाळांमधील २५% राखीव जागा खालील गटातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात:
1️⃣ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) – कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखापेक्षा कमी असावे.
2️⃣ वंचित गट (Disadvantaged Group) – अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती, भटक्या जमाती (VJNT), इतर मागासवर्ग (OBC), विशेष सक्षम विद्यार्थी (Divyang), अनाथ, HIV बाधित किंवा गरजू विद्यार्थी.
कोणत्या शाळांमध्ये RTE २५% प्रवेश लागू आहे?
🏫 खाजगी विनाअनुदानित शाळा – यांना आपल्या २५% जागा RTE अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्या लागतात.
🏫 अनुदानित शाळा, सरकारी शाळा आणि केंद्रीय विद्यालयांवर (KV) हा नियम लागू नाही.
केन्द्रीय विद्यालय प्रवेश प्रक्रिया 2025-26 सुरू – संपूर्ण माहिती! येथे पाहा
RTE प्रवेश प्रक्रिया कशी असते?
1️⃣ ऑनलाइन अर्ज: पालकांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत RTE प्रवेश पोर्टलवर (student.maharashtra.gov.in) अर्ज करावा लागतो.
2️⃣ लॉटरी प्रणाली: जर अर्ज केलेल्या जागांपेक्षा अधिक अर्ज आले, तर प्रवेशासाठी लॉटरी पद्धत (random selection) वापरली जाते.
3️⃣ प्रवेश निश्चिती: निवड झाल्यास, पालकांनी संबंधित शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
4️⃣ शैक्षणिक शुल्क: निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पूर्ण शिक्षण शुल्क महाराष्ट्र शासन भरते.
RTE प्रवेश प्रक्रिया: RTE Admission 2025-26 Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया यंदा डिसेंबर महिन्यापासूनच सुरू करण्यात आली होती. त्यानुसार आता RTE Admission 2025-26 Maharashtra Result लॉटरी निकाल जाहीर झाला असून, RTE कोट्यातून निवड झालेल्या मुलांचे प्रवेश सुरू आहेत. अधिक माहितीसाठी वाचा.
अधिक माहितीसाठी RTE अधिकृत वेबसाईट: https://student.maharashtra.gov.in/