Maharashtra Weather Update : महाराष्ट्र राज्यातील पुढील दोन दिवसात हवामान कसे राहणार आहे, याचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.
राज्यातील दक्षिण कोंकणात आज (दि 13 जून) रोजी अनेक ठिकाणी तर आज आणि उद्या कोंकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २७°C च्या आसपास असणार आहे.
दिनांक 14 ते 15 जून रोजीचा पाऊस अंदाज जिल्हानिहाय येथे पाहा
महाराष्ट्र हवामान अंदाज : असे असेल पुढील 2 दिवसांचा हवामान अंदाज
दिनांक १३ जून २०२४ रोजी (Maharashtra Weather Update) दक्षिण कोंकणात अनेक ठिकाणी व उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा (वेग ३०-४० कि मी प्रति तास) राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दिनांक १३ जून २०२४ रोजी पुणे, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिनांक १४ जून २०२४ रोजी (#WeatherUpdate) कोकणात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पीएम PM किसान लाभार्थी यादीत नाव येथे चेक करा – डायरेक्ट लिंक
लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, सविस्तर तपशील जाणून घ्या