Emplyoee Promotion : सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा २०२४ च्या आयोजनाबाबत परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024
सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-२०२४ ही मंगळवार, दि.०३ डिसेंबर, २०२४ ते शुक्रवार, दि.०६ डिसेंबर, २०२४ या कालावधीत विज्ञान संस्था, मादाम कामा मार्ग, फोर्ट, मुंबई ४०००३२ येथे आयोजित करण्यात येणार आहे.
परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
सदर परीक्षेसाठी उमेदवारांना खालील सुचना देण्यात येत आहेत.
- परीक्षा कालावधीत प्रत्येक उमेदवाराने स्वतः ये शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
परीक्षा केंद्रातील सूचना फलकावरील दालन क्रमांक व आसन क्रमांकानुसार बैठक व्यवस्था असेल. - परीक्षा सुरु होण्यापूर्वी ४५ मिनिटे अगोदर उमेदवाराने परीक्षेच्या केंद्रावर हजर रहावे.
- परीक्षा सुरु झाल्यावर कोणत्याही उमेदवारास परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षेच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक पेपर सुरु होण्यापूर्वी तसेच पेपर सपंण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर इशारा देणारी घंटा देण्यात येईल.
- उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील आवश्यक सर्व तपशील उमेदवारांनी अचूकपणे भरणे आवश्यक आहे.
- मुखपृष्ठाच्या मागील बाजूस उमेदवाराने कोणतेही लिखाण करु नये. उत्तरपत्रिकेच्या आतील पानांवर तसेच पुरवणीवर उमेदवाराने स्वत:चे नाव, स्वाक्षरी, आसन क्रमांक इत्यादी कोणताही मजकूर लिहू नये.
- उत्तरपत्रिका प्रअपत्रिकेच्या कोणत्याही भागावर उमेदवाराने स्वाक्षरी करु नये. तसेच सही करणे किंवा ओळख पटवून देण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा खुणांचा निर्देश करणे ही बाब आक्षेपार्ह समजण्यात येईल व त्या प्रकरणी खालील नमूद अ.क्र.९ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
- उमेदवाराने उत्तरपत्रिकेचे मुखपृष्ठ व त्याची मागील बाजू वगळून इतर सर्व पृष्ठांवरील दोन्ही बाजूस उत्तरे लिहावीत,
- परीक्षेसाठी विहित केलेली अधिकृत शासकीय पुस्तके/अधिनियम/नियम/शासन निर्णय त्या त्या पेपरच्या वेळी उमेदवारांना परीक्षा कक्षात वापरण्याची परवानगी राहील.
- विहित केलेली मुळ पुस्तके उपलब्ध नसल्यास, विहित पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती परीक्षेच्या वेळी वापरण्यास परवानगी राहील. मात्र परीक्षेसाठी विहित केलेल्या पुस्तकांमध्ये अथवा पुस्तकांच्या झेरॉक्स प्रतींवर अथवा अधिनियम/नियम/शासन निर्णयाच्या प्रतींवर इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केलेले नसावे. यासोबतच साधे गणकयंत्र परीक्षेसाठी वापरण्याची परवानगी देण्यात येत आहे.
- उमेदवारांनी परीक्षा दालनात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वर्तन करु नये, परीक्षेच्या वेळी आक्षेपार्ह वर्तन कॉपी करणे / बघून लिहिणे / अन्य उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेतून अथवा त्यांच्याशी चर्चा करुन उत्तर लिहिणे, परीक्षा दालनात भ्रमणध्वनी (मोबाईल), पेजर अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ बाळगणे इत्यादी करणाऱ्या उमेदवारास संबंधित प्रश्नपत्रिकेत अनुत्तीर्ण घोषित करण्यात येईल तसेच त्यावर्षीच्या उर्वरीत सर्व प्रश्नपत्रिकांना बसण्यासाठी अपात्र ठरविण्यात येईल.
- परीक्षा संपण्याच्या १० मिनिटे अगोदर उमेदवारांनी आपली उत्तरपत्रिका व पुरवणी एकत्र बांधून घ्यावी.
परीक्षा सुरु असताना आणि परीक्षा संपल्यानंतर समवेक्षकांनी परवानगी दिल्याखेरीज जागा सोडू नये.
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर परिपत्रक परीक्षेला प्रवेश दिलेल्या सर्व उमेदवारांच्या (जे उमेदवार रजेवर / प्रतिनियुक्तीवर असतील त्यांच्यासह) तातडीने लेखी स्वरुपात निदर्शनास आणून, त्याबाबतची नोंद आपल्या विभागाच्या अभिलेखात जतन करुन ठेवावी. याबाबत दिरंगाई होणार नाही याची संबंधित विभागाच्या आस्थापना शाखेने दक्षता घ्यावी.