कामानुसार हुद्दा व हुद्यानुसार वेतनश्रेणी लागू करणेबाबत शासन निर्णय निर्गमित Pay scale Applicable as per Position

By MarathiAlert Team

Updated on:

Pay scale Applicable as per Position महाराष्ट्र शासनाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयात श्री. जयंत वशवराम भामरे (मुकादम) यांना 1987 ते 1997 या कालावधीत केलेल्या कामाच्या आधारे कामानुसार हुद्दा व त्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्यास दिनांक 17 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे.

काय आहे प्रकरण?

श्री. भामरे यांनी लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग, धुळे येथे मुकादम पदावर कार्यरत असताना हजेरी पट भरणे, मजुरांचे वेतन अदा करणे, मोजणीचे काम अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, त्यांना त्यांच्या मूळ पदाचेच वेतन देण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 29 सप्टेंबर 2003 रोजीच्या शासन निर्णयान्वये जलसंपदा (तत्कालिन पाटबंधारे), सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास व जलसंधारण विभागातील रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांकडून दिनांक २८.५.१९८६ ते दिनांक ३१.१२.१९९७ या कालावधीत नेमणूक दिलेल्या मूळ पदाऐवजी इतर पदाचे काम करुन घेण्यात आले आहे आणि मूळ पदाचेच वेतन दिलेले आहे, अशा कर्मचाऱ्यांना कामानुसार हुद्दा व हुद्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी: शासन निर्णय वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!