Post Matric Scholarship Timetable 2025 26 भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आता महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी या तारखांची नोंद घेऊन वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती कोणासाठी आहे?
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना ही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जे मॅट्रिक अर्थात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेत आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन/उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी.
Post Matric Scholarship Timetable 2025 26
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अर्जांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
- कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम (इयत्ता ११वी, १२वी, सर्व शाखा, MCVC, ITI इत्यादी):
- नवीन अर्ज आणि नूतनीकरणाचे अर्ज महाविद्यालयांनी १५ जून ते १५ ऑगस्ट २०२५ या मुदतीत ऑनलाईन अग्रेषित (forward) करावेत.
- वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष, सर्व शाखा – कला, वाणिज्य, विज्ञान इत्यादी):
- नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज महाविद्यालयांनी १५ जून ते १० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अग्रेषित करावेत.
- वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रथम, द्वितीय, तृतीय अंतिम वर्ष – अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग अभ्यासक्रम इत्यादी):
- नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज महाविद्यालयांनी १५ जून ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अग्रेषित करावेत.
महाविद्यालयांसाठी महत्त्वाच्या सूचना: सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्राप्त झालेल्या अर्जांची प्राधान्याने पडताळणी (verification) करून ते ऑनलाईन पद्धतीने मंजूर करावेत. त्यानंतर हे अर्ज तातडीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांच्या लॉगिनवर पाठवावेत.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर, सुनिता मते यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन केले आहे की, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील (SC category) एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी या वेळापत्रकाचे पालन करून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आता महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीद्वारे राबवण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता नवीन तसेच नूतनीकरण (renewal) अर्ज २५ जुलै २०२४ पासून स्वीकारले जात आहेत. विशेष म्हणजे, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील नूतनीकरणाचे अर्ज आणि २०२४-२५ मधील नवीन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२५ आहे. त्यानुसार, १५ जूनपासून शिष्यवृत्तीसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांची यादी