International Universities In India परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार!

Published On: June 15, 2025
Follow Us
International Universities In India

International Universities In India भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठांमध्ये जाण्याची आता गरज राहणार नाही. महाराष्ट्र राज्य शासनाने आज राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पाच नामांकित परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र (Letter of Intent – LoI) प्रदान केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मुंबई आणि नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे पहिले शैक्षणिक हब उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ताज हॉटेल येथे आयोजित ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणती विद्यापीठे येत आहेत भारतात? International Universities In India

International Universities In India मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅबर्डीन (स्कॉटलंड, यु.के.), युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यु.के.), युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका) आणि इस्तितुतो युरोपियो दी डिझाईन (इटली) ही जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात येत आहेत. ही सर्व विद्यापीठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आपले पूर्ण कॅम्पस उभारणार आहेत.

परदेशी विद्यापीठांची वैशिष्ट्ये:

  • युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅबर्डीन (स्कॉटलंड, यूके): यूकेमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ. या विद्यापीटाने भारतातील २०० हून अधिक विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांशी भागीदारी केली आहे.
  • युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया): जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले आणि प्रतिष्ठित ग्रुप ऑफ एट (Go8) विद्यापीठांमध्ये अग्रगण्य. विज्ञान, औद्योगिक आणि अभियांत्रिकी (STEM) तसेच व्यवसाय या क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असतील.
  • यॉर्क विद्यापीठ (यूके): यूकेमधील एक प्रतिष्ठित संशोधन-केंद्रित संस्था आणि रसेल ग्रुपची सदस्य. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशील उद्योगांसह संगणक विज्ञानातील अत्याधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध होतील.
  • इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक, अमेरिका): स्वतंत्रपणे पदवी देणारे आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ. संगणक विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसाय यांसारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये शिक्षण उपलब्ध करेल. त्यांचा प्रसिद्ध एलिव्हेट प्रोग्राम विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन आणि स्पर्धांच्या संधी देईल.
  • इस्टितुतो युरोपियो दी डिझाईन (IED, इटली): युरोपमधील एक अग्रगण्य डिझाइन शाळा. फॅशन, उत्पादन डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य प्रदान करेल.

शिक्षण हबमुळे काय फायदा होईल?

International Universities In India

या पुढाकारामुळे मुंबईची ओळख आता केवळ वित्तीय, औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर अशी न राहता ‘एज्युकेशनल सिटी’ म्हणूनही होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे या विद्यापीठांना आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे परदेशी विद्यापीठांना भारतात येण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. यामुळे परदेशी जाऊन शिक्षण घेणे शक्य नसलेल्या हजारो भारतीय तरुणांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होईल. सध्या पाच विद्यापीठे आली असली तरी भविष्यात आणखी विद्यापीठांचे स्वागत करण्यास राज्य शासन तयार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘विकसित भारत २०४७’ च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले की, मुंबई ही स्वप्नांची आणि आर्थिक राजधानीची नगरी आहे. आता ती शिक्षणाचेही एक महत्त्वाचे केंद्र बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील ‘विकसित भारत २०४७’ चे स्वप्न साकार करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे आहे. यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना कमी खर्चात भारतात उपलब्ध होईल. भारतातील आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्था परदेशात शाखा उघडत आहेत, तर परदेशी विद्यापीठे भारतात येऊन शिक्षण देणार आहेत. हा निर्णय भारताला शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रधान यांनी सांगितले.

हा उपक्रम भारतीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवे दालन उघडणार असून, यामुळे भारताची जागतिक शैक्षणिक नकाशावरील स्थिती आणखी मजबूत होईल.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment