Anganwadi Sevika Aug Salary राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने २९३.८०९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
तसेच यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट, २०२५ पासून सुरू होत असल्यामुळे, राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि पेन्शन १ सप्टेंबर, २०२५ ऐवजी २६ ऑगस्ट, २०२५ रोजी अदा करण्याचे निर्देश दिले आहे.
हा निधी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ६०% हिस्सा, राज्याचा ४०% हिस्सा आणि राज्याचा अतिरिक्त १००% हिस्सा यांचा समावेश आहे.
- एकूण निधी: २९३.८०९५ कोटी रुपये
- केंद्र सरकारचा हिस्सा (६०%): ६९.०५३७ कोटी रुपये
- राज्य सरकारचा हिस्सा (४०%): ४६.०३५८ कोटी रुपये
- अतिरिक्त राज्य सरकारचा हिस्सा (१००%): १७८.७२ कोटी रुपये
हा निधी वितरीत करण्यासाठी नियोजन विभाग आणि वित्त विभागाने सहमती दिली होती. या शासन निर्णयानुसार, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना हा निधी तातडीने SNA (Single Nodal Agency) खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा