MAHA TET 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ऑनलाईन अर्ज सुरू, डायरेक्ट लिंक तपासा

By MarathiAlert Team

Updated on:

MAHA TET 2025 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर २०२५ आहे. परीक्षेची महत्त्वपूर्ण माहिती आणि अर्ज कसा करायचा, याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

MAHA TET 2025

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

MAHA TET Exam Date 2025 ही परीक्षा रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्याचे नियोजन आहे.

MAHA TET PAPER Syllabus

इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी शिक्षक पदावर नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी अभ्यासक्रम माध्यम व विषय निहाय खालीलप्रमाणे आहे.

MAHA TET PAPER 1 Syllabus

MAHA TET PAPER 1 Syllabus

MAHA TET PAPER 2 Syllabus

MAHA TET PAPER 2 Syllabus

MAHA TET PAPER 1 AND 2 Syllabus PDF Download

MAHA TET 2025 Schedule महत्त्वाच्या तारखा

MAHATET 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:

  • ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची मुदत: १५ सप्टेंबर २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२५.
  • प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध: १० नोव्हेंबर २०२५ ते २३ नोव्हेंबर २०२५.
  • पेपर १ (इ. १ ली ते ५ वी) परीक्षेची वेळ: रविवार, २३ नोव्हेंबर २०२५, सकाळी १०:३० ते दुपारी १:००.
  • पेपर २ (इ. ६ वी ते ८ वी) परीक्षेची वेळ: रविवार, २३ नोव्हेंबर २०२५, दुपारी २:३० ते संध्याकाळी ५:००.

अर्ज कसा कराल?

MAHATET 2025 साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज भरताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • अर्ज फक्त इंग्रजी भाषेतच भरायचा आहे.
  • सर्व माहिती मूळ प्रमाणपत्रांवरूनच भरा, जसे की दहावी आणि बारावीचे गुण, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, जात इत्यादी.
  • ऑनलाइन अर्जासोबत नवीन रंगीत फोटो, स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र आणि ओळखपत्र स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही. दोन्ही पेपर देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी फक्त एकच अर्ज भरावा आणि दोन्ही स्तरांसाठी पर्याय निवडावा.
  • परीक्षा शुल्क क्रेडिट/डेबिट कार्ड, ऑनलाइन बँकिंग इत्यादीद्वारे ऑनलाइन भरावे लागेल. एकदा शुल्क भरले आणि अर्ज सबमिट केला की त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत.

महत्त्वाची सूचना

परीक्षेच्या वेळापत्रकात प्रशासकीय कारणांमुळे बदल होण्याची शक्यता आहे.सर्व अपडेट माहिती आणि सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट https://mahatet.in वर प्रसिद्ध केल्या जातील. त्यामुळे उमेदवारांनी या वेबसाइटला नियमित भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी तुम्ही ९०२८४७२६८१/८२/८३ या हेल्पलाइन नंबरवर सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत संपर्क साधू शकता.

महत्वाच्या लिंक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ च्या संदर्भात अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mscepune.in/ तसेच MAHA TET च्या ऑनलाईन पोर्टल https://mahatet.in वर भेट द्यावी.

MAHA TET 2025 मूळ नोटिफिकेशन येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!