Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana: आपल्या देशात आरोग्य सेवा आजही अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. गंभीर आजार झाले की उपचारांचा मोठा खर्च पाहून सर्वसामान्य माणूस हवालदिल होतो. पण आता महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी एक आशेचा किरण दिसू लागला आहे. या दोन्ही योजनांअंतर्गत मिळणाऱ्या ५ लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या उपचारांसाठी गरजू रुग्णांना निधी मिळणार आहे.
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana या नऊ आजारांसाठी 5 लाखांपेक्षा जास्त निधी मिळणार
गरीब रुग्णांना दिलासा देणारा हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. काही आजार इतके गंभीर आणि खर्चिक असतात की, त्यांच्या उपचारांचा खर्च ५ लाख रुपयांपेक्षाही जास्त असतो. यामुळे अनेक गरीब आणि गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहत होते.
आता सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे यकृत, अस्थिमज्जा, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारांसाठीही मदत मिळणार आहे. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीचा वापर केला जाणार आहे.
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana योजने अंतर्गत हा एक मोठा बदल आहे, जो अनेक कुटुंबांना आर्थिक मदत देईल. या निर्णयानुसार, सरकारी रुग्णालयांना राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून मिळणाऱ्या निधीपैकी २०% रक्कम राखीव निधी म्हणून ठेवली जाईल. उर्वरित ८०% रक्कम रुग्णालयांना दिली जाईल, ज्याचा उपयोग पायाभूत सुविधा, औषधं, आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी केला जाईल.
कोणत्या आजारांसाठी किती मदत मिळणार?
या नवीन निर्णयामुळे ५ लाखांपेक्षा जास्त खर्च असलेल्या नऊ दुर्धर आजारांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे रुग्णांना उपचाराचा खर्च परवडेल. यामध्ये प्रत्येक रुग्णामागे मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे आहे:
- हृदय प्रत्यारोपण: १५ लाख रुपये
- फुफ्फुस प्रत्यारोपण: २० लाख रुपये
- हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण: २० लाख रुपये
- यकृत प्रत्यारोपण: २२ लाख रुपये
- अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अलोजेनिक): ९.५ लाख रुपये
- अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अनरिलेटेड): १७ लाख रुपये
- अस्थिमज्जा प्रत्यारोपण (हॅप्लो): १७ लाख रुपये
- ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI): १० लाख रुपये
- ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (TMVR): १० लाख रुपये
भविष्यातील बदल आणि समिती
या योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी, उपचारांचे दर ठरवावेत आणि निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समितीही स्थापन करण्यात येणार आहे.
Mahatma Phule Jan Arogya Yojana या योजनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेचा उद्देश आहे की कोणताही गरीब रुग्ण केवळ पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहू नये. त्यामुळे ही Mahatma Phule Jan Arogya Yojana खऱ्या अर्थाने आरोग्य क्रांती घडवेल, असे म्हणता येईल.
डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता Doctors and Staff incentive Allowance
या योजनेत सहभागी असलेल्या सरकारी रुग्णालयांचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्त्यातही (Doctors and Staff incentive Allowance) सुधारणा करण्यात आली आहे. त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रोत्साहन भत्त्याबाबतच्या नियमांमध्ये सूट देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.










