गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार

By Marathi Alert

Published on:

Anganwadi Sevika Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योज़नेसाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका ‘याही’ लाडक्या बहिणींना प्रति लाभार्थी देय प्रोत्साहन भत्ता गौरी-गणपती सणापूर्वी द्यावा, अशी विनंती मा. आ. धिरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी केली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलिस पाटलांच्या संदर्भात गुड न्यूज!

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजने अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु.50/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ‘इतके’ रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार

Leave a Comment