आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना एप्रिल २०२५ चे मानधन वितरीत करण्यास सरकारची मंजुरी Asha Worker April Salary 2025

Published On: May 28, 2025
Follow Us
Asha Worker April Salary 2025

Asha Worker April Salary 2025 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना एप्रिल २०२५ महिन्याचे मानधन म्हणून रु. ८४१८.८६ लाख वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भात, २८ मे २०२५ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Asha Worker April Salary 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महाराष्ट्रात कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि निकषांनुसार, त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नेमून दिलेल्या सेवांसाठी प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो.

या दोन्ही घटकांची राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे, त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय १४ मार्च २०२४ आणि २० सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता, त्यानुसार आशा स्वयंसेविकांना रु. १०,०००/- आणि गटप्रवर्तकांना रु. ११,२००/- इतका मोबदला निश्चित करण्यात आला आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी राज्य शासनाकडून रु. ३२८६८.०० लाख इतके अनुदान मंजूर झाले आहे. यापैकी, एप्रिल २०२५ साठी रु. ८४१८.८६ लाख आणि नागपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी तसेच लातूर महानगरपालिकेसाठी मार्च २०२५ चे रु. ४४१.९७ लाख असे एकूण रु. ८८६०.८४ लाख मानधन वितरीत करण्याची विनंती वित्त व नियोजन विभागाला करण्यात आली होती. वित्त विभागाने एप्रिल २०२५ च्या मानधनासाठी रु. ८४१८.८६ लाख निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

No Work No Pay New GR

काम नाही तर वेतन नाही हा नियम रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय! अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा!

January 31, 2026
Teacher Personal Approval NEW GR 2026

शिक्षक वैयक्तिक मान्यता प्रस्ताव सादर करताना ‘या’ 3 बाबींची होणार कडक तपासणी – शासन निर्णय जारी

January 31, 2026
7th Pay Commission Salary Fixation New GR

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींवर शासनाचा मोठा निर्णय!

January 30, 2026
Anganwadi Sevika January Salary 2026

खुशखबर: अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन वितरणासाठी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

January 30, 2026
ICDS Employee Salary GR

गुड न्यूज! ICDS कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्याच्या पगारासाठी निधी वितरीत; शासन निर्णय निर्गमित

January 30, 2026
ZP Arogya Sevika Regularization New GR 2026

जिल्हा परिषद आरोग्य सेविकांच्या सेवा नियमित करण्याचे सुधारित आदेश जारी

January 29, 2026

Leave a Comment