Asha Worker Bharti आशा स्वयंसेविका पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, पनवेल महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत २०२४-२५ वर्षासाठी मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रिक्त आशा स्वयंसेविकांची पदे भरण्यात येत आहेत. ही पदभरती थेट मुलाखतीद्वारे (Walk-in-Interview) केली जाणार आहे.
Asha Worker Bharti संपूर्ण माहिती
- पदाचे नाव: आशा स्वयंसेविका
- एकूण रिक्त पदे: 40
शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा:
- किमान १० वी उत्तीर्ण किंवा उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य दिले जाईल.
- वयोमर्यादा २० ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे.
- आशा स्वयंसेविका स्थानिक वस्तीमधील कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विवाहित महिलांना प्राधान्य दिले जाईल.
- आदिवासी, विधवा, परित्यक्ता महिलांना आणि स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल.
- शासकीय सेवेत लिंक वर्कर, महानगरपालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रम (राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम, महिला आरोग्य समिती, नियमित लसीकरण कार्यक्रम सपोर्ट ग्रुप) यामध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल (अनुभवाचे प्रमाणपत्र आवश्यक).
निवड प्रक्रिया: निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांना खालीलप्रमाणे १५ गुण दिले जातील:
- शैक्षणिक पात्रता: ६ गुण
- फक्त १० वी पास असल्यास शून्य गुण. त्यानंतरच्या प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या पात्रतेसाठी २ गुण दिले जातील. निवड समिती जास्तीत जास्त ६ गुण देऊ शकते (उदा. १२ वी पास असल्यास ४ गुण).
- कामाचा अनुभव: ५ गुण
- आरोग्य विषयक कामाच्या प्रत्येक एका वर्षाच्या अनुभवासाठी ०१ गुण दिला जाईल. चांगल्या स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ती असल्यास अधिक गुण दिले जातील. निवड समिती जास्तीत जास्त ५ गुण देऊ शकते.
- विधवा/परित्यक्ता: ०२ गुण
- विधवा/परित्यक्ता महिला असल्यास ०२ गुण दिले जातील.
- संभाषण व प्रोत्साहन कौशल्य: ०२ गुण
- उत्तम संभाषण व प्रोत्साहन कौशल्यासाठी २ गुण दिले जातील. निवड समिती जास्तीत जास्त २ गुण देऊ शकते.
मुलाखतीसाठी १:५ या प्रमाणात उमेदवारांना बोलावले जाईल. जाहिरातीत नमूद केलेल्या दिनांकास सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत अर्ज स्वीकारले जातील आणि त्याच दिवशी दुपारी २.०० वाजता पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील.
Asha Worker Salary | महाराष्ट्रात आशा सेविकांना दरमहा किती पगार मिळतो?
आशांना केंद्र व राज्य शासन स्तरावरून दरमहा मिळणारा मोबदला खालीलप्रमाणे आहे.
- नियमित चार बाबींवरील मोबदला (केंद्र शासन) रु 2,000
- आरोग्यवर्धिनी अंतर्गत दरमहा टिम बेस मोबदला (केंद्र शासन) रु 1,000
- दिनाक १७ जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला (राज्य शासन) रु 2,000
- दिनांक ९ सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला (राज्य शासन) रु 1,500
- दिनांक १० एप्रिल २०२३ शासनाकडून मोबदला (राज्य शासन) रु 1500
- दिनांक १४ मार्च २०२४ शासनाकडून मोबदला (राज्य शासन) रु 5,000
असे एकूण केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून रु 1,3000 आशा स्वयंसेविका यांना दरमहा मोबदला (पगार) देण्यात येतो. याव्यतिरिक्त आरसीएच कार्यक्रम व राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लागू असलेला कामावर आधारित मोबदला आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामाच्या प्रमाणात अदा करण्यात येतो.
Asha Worker Bharti अटी व शर्ती:
- आशा स्वयंसेविका जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या कामकाज क्षेत्राची स्थानिक/कायमची रहिवासी असावी. जर स्थानिक उमेदवार उपलब्ध नसेल, तर लगतच्या कार्यक्षेत्रातील पात्र उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाईल.
- आशा स्वयंसेविकेस मासिक ठोक वेतन, मानधन किंवा कोणताही एकत्रित दरमहा भत्ता दिला जाणार नाही.
- नियुक्त आशा स्वयंसेविकेस शासन आदेशानुसार कामावर आधारित मोबदला PFMS द्वारे थेट बँक खात्यावर अदा केला जाईल आणि शासनाकडून वेळोवेळी प्राप्त सूचना लागू राहतील.
- निवड व प्रतीक्षा यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.panvelcorporation.com वर प्रसिद्ध केली जाईल.
- अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदर पदे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कामावर आधारित आहेत, आणि त्यांचा पनवेल महानगरपालिका आस्थापनेशी कोणताही संबंध राहणार नाही.
- ही पदे तात्पुरत्या स्वरूपात भरली जात असल्याने, अर्जदारास कायमस्वरूपी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही. ज्या दिवशी या पदांची आवश्यकता नसेल, त्या वेळी कोणतीही सूचना न देता सेवा समाप्त केली जाईल.
- भरती प्रक्रिया रद्द करणे किंवा स्थगित करण्याचे संपूर्ण अधिकार आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी राखुन ठेवले आहेत.
- मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना राहण्याची, जेवणाची आणि प्रवास खर्चाची सुविधा किंवा लाभ दिला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या नमुन्यातील अर्ज आणि त्यासोबत शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, तसेच खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात. मूळ कागदपत्रे अर्जासोबत जोडू नयेत.
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्म दाखल्याचा पुरावा (जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला)
- वास्तव्याचा पुरावा: आधारकार्ड / मतदान ओळखपत्र / रेशनकार्ड
- अनुभव प्रमाणपत्र
- निकषानुसार आवश्यक दस्ताऐवज
मुलाखतीचे ठिकाण, दिनांक आणि वेळ:
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १, गावदेवी, पनवेल (०१ पद रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १, गावदेवी पाडा, पनवेल येथे २१.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र २, कोळीवाडा, पनवेल (०३ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र २, अभिदिप सोसायटी, कोळीवाडा, उरणनाका, पनवेल येथे २३.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ३, नवीन पनवेल (०५ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ३, सेक्टर १८, भांटिया स्कुलजवळ, नवीन पनवेल येथे २७.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ४, कळंबोली (०१ पद रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ४, सेक्टर ११, गुरूद्वारा जवळ येथे ३०.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ५, खारघर (एकूण १५ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ५, सेक्टर १५, अयप्पा मंदिर जवळ, खारघर येथे २८.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ७, काळुंद्रे/भिंगारी, पनवेल (०२ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ७, जुने ग्रामपंचायत कार्यालय, मराठी शाळेसमोर, भिंगारी पनवेल येथे २९.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ८, कळंबोली गाव (०१ पद रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ०८, कालभैरव सभागृहाजवळ, प्रभाग समिती क समोरील कार्यालय, कळंबोली गाव येथे २७.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १०, रोहिंजण (०२ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १०, जुने उपकेंद्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्कुल च्या मागे, रोहिंजण येथे २०.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ११, खांदा कॉलनी (०२ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ११, गुरूदेव आरकेड, प्लाट नं ७, से, ९ खांदा कॉलनी येथे २२.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १३, कळंबोली से. २० (०३ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १३, गाळा क्र. १,२,३ व ४, तळमजला, वैष्णवी हाईट्स, प्लॉट क्र. ३६, से. २०, रोडपाली, कळंबोली येथे १९.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १४, कामोठे से. २२ (०३ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १४, प्रभु श्राइन को ऑप. सोसायटी प्लॉट नं ८५, से २२ कामोठे येथे २९.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १५, कामोठे से. ३५ (०२ पदे रिक्त): नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १५, गाळा क्र. ५, कार्यालय क्र. १ व २, १ला मजला, स्वस्तिकराधा, प्लॉट क्र. १२, से. ३५ कामोठे येथे २६.०५.२०२५ रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी १ वा. अर्ज स्वीकारले जातील आणि दु. २.०० वा. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जातील.
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती
आशा स्वयंसेविका पदांसाठी अर्जाचा नमूना | Asha Worker Application Form
Asha Worker Bharti अर्जदाराने अर्जात आपले संपूर्ण नाव, लग्नापूर्वीचे नाव, पतीचे/वडिलांचे नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, कायमस्वरूपी पत्ता, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, वैवाहिक स्थिती (विवाहित/विधवा/परित्यक्ता) इत्यादी तपशील द्यावा. तसेच, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या आहेत याची खात्री करावी.


अधिक माहितीसाठी : आशा स्वयंसेविका पदांसाठीची जाहिरात व अर्जाचा नमूना येथे डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट : https://www.panvelcorporation.com/