MCGM Recruitment 2025 बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत NCD विभागात (Non-Communicable Diseases Program) एकूण 115 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात BMC च्या www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीचे सविस्तर तपशील पाहूया.
Table of Contents
MCGM Recruitment 2025 जाहिरात तपशील
- विभाग: NCD विभाग (Non-Communicable Diseases)
- एकूण जागा: 115
- निवड प्रक्रिया : निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा होणार नाही.
पदांची नावे व रिक्त पदांचा तपशील

आवश्यक शैक्षणिक अहर्ता तपशील
1) कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator)
शैक्षणिक पात्रता:
- M.B.B.S किंवा BAMS / BHMS / BDS (महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किंवा राष्ट्रीय वैद्यकीय परिषद मान्यताप्राप्त)
- सार्वजनिक आरोग्य / आरोग्य प्रशासन विषयातील पदव्युत्तर पदवी (Diploma / Masters in Public Health / DHA / CHA) असल्यास प्राधान्य
- किमान १ वर्षाचा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील अनुभव (सार्वजनिक/गैर-सरकारी संस्था)
- MS-CIT किंवा शासनमान्य संगणक कोर्स उत्तीर्ण
- समकक्ष पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य
2) आहारतज्ञ (Dietician)
शैक्षणिक पात्रता:
- B.Sc. (Dietetics) मान्यताप्राप्त विद्यापीठातून
किंवा - UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून Nutrition & Dietetics मध्ये पदव्युत्तर Diploma / M.Sc. / Masters
- MS-CIT किंवा शासनमान्य संगणक कोर्स उत्तीर्ण
- समकक्ष पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य
3) कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी (वाणिज्य/विज्ञान/कला/विधी इ.)
- मराठी व इंग्रजी विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
- शासन मान्यताप्राप्त इंग्रजी व मराठी टंकलेखन (30 श.प्र.मि.) प्रमाणपत्र
- MS-CIT किंवा शासनमान्य संगणक कोर्स उत्तीर्ण
- संगणक ज्ञान: Word, Excel, Presentation, Email, Internet
- किमान ५ वर्षांचा समकक्ष पदाचा अनुभव
4) डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator – DEO)
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- संगणक अनुप्रयोगातील डिप्लोमा
- मराठी विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
- MS-CIT किंवा शासनमान्य संगणक कोर्स उत्तीर्ण
- शासन मान्यताप्राप्त टंकलेखन कोर्स (मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि.)
- डेटा एन्ट्री वेग: 8000 Key Depressions
- MS Word, Excel, Basic Statistics, Programming चे ज्ञान
- किमान १ वर्षाचा समकक्ष पदाचा अनुभव
5) एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू (NCD Corners MPW)
शैक्षणिक पात्रता:
- माध्यमिक शालांत परीक्षा (मराठी विषय १०० गुणांसह) उत्तीर्ण
- MS-CIT किंवा शासनमान्य संगणक कोर्स उत्तीर्ण
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १९ मे २०२५ पर्यंत
पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया:
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी दि. २९/०४/२०२५ ते १९/०५/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत खालीलप्रमाणे अर्ज सादर करावा:
अर्ज पद्धत:
- अर्ज गूगल फॉर्म लिंकद्वारे ऑनलाईन करावेत.
- सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
- दि. १९/०५/२०२५ संध्या. ५.०० नंतरचे अर्ज अमान्य ठरविण्यात येतील.
कागदपत्रांची यादी:
सदर पदांकरिता (अर्हतेनुसार) आवश्यक कागदपत्रांची यादी.
- अर्जाचा नमूना
- SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- HSC गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदव्युतर गुणपत्रक व प्रमाणपत्र
- अतिरिक्त डिग्री / डिप्लोमा प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र / संगणक प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
या भरतीची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर, प्रमुख वर्तमानपत्रात तसेच तिसरा मजला, एफ/ दक्षिण, मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई ४०००१२ आणि वॉर्ड क्र. ३८, असंसर्गजन्य रोग विभाग, कस्तुरबा रुग्णालय यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर केवळ दि. २९/०४/२०२५ ते दि. १९/०५/२०२५ पर्यंत प्रदर्शित करण्यात आली आहे.
महत्वाच्या लिंक
- मूळ जाहिरात व अर्जाचा नमूना येथे डाउनलोड करा
- गुगल फॉर्म लिंकवर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट : https://www.mcgm.gov.in/
MCGM Recruitment 2025 पदानुसार कामाचे स्वरूप
१. कार्यक्रम समन्वयक :
- नॅशनल प्रोग्राम फॉर नॉन कम्युनिकेबल डिसीज (NPNCD) या कार्यक्रमा अंतर्गत राबविले जाणारे विविध उपक्रम, देखरेख, लोकसंख्या आधारित सर्वेक्षण व कार्यक्रमाचे पर्यवेक्षण करणे.
- सीएचव्ही आशा यांच्याकडून भरण्यात येणा-या सीबॅक फॉर्म आणि पोर्टल माहिती अद्ययावत करण्यासाठी देखरेख व सहाय्य करणे.
- आहारतज्ञांसोबत समन्वय साधून वस्ती पातळीवर चर्चासत्रे आयोजित करणे.
- आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे व कार्यक्रम राबवताना येणाऱ्या अडचणर्णीचे अवलोकन करून त्यावरील उपाययोजनासाठी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करणे.
- मनपा दवाखाने, एचबीटी दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये येथे भेटी देऊन असंसर्गजन्य कार्यक्रमांची माहिती घेणे व कार्यक्रमांच्या बळकटीसाठी सहाय्य करणे.
- वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशानुसार साप्ताहिक सभा घेऊन कार्यक्रमांच्या प्रगतीचा पाठपुरावा करणे.
- राष्ट्रीय आरोग्य विषयक दिवस साजरे करणे.
- साप्ताहिक व मासिक अहवाल तयार करण्यास मदत करणे.
- मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांना योगा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती करणे व योगा केंद्रांना भेटी देणे.
- स्टॉक / रजिस्टर / मटेरियल्स यांच्या नोंदणी ठेवणे.
- सर्व उपनगरीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांच्यातर्फे होणारे एनसीडीशी संबंधित असलेले काम यांचे अहवाल संकलित करणे,
- एकात्मिक कर्करोग प्रतिबंध कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वेक्षण व पर्यवेक्षण करणे.
- कर्करोगाबाबत जनजागृती करून संशयित रुग्णांना जवळच्या संबंधित उपनगरीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात निदान व उपचारांसाठी पाठवणे.
२. आहारतज्ञ
- मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांना समुपदेशन करणे.
- प्रत्येक नियमित दवाखाने व आपला दवाखाना येथे १५ दिवसांतून एकदा चक्राकार पद्धतीने भेटी तसेच ज्या प्रभागांमध्ये दवाखान्यांची संख्या जास्त आहे त्या प्रभागांमध्ये दोन आहारतज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- प्रत्येक प्रभागातील नियमित दवाखाने व आपला दवाखाना येथे दररोज चक्राकार पद्धतीने कमीत कमी बारा रुग्णांना समुपदेशन करणे.
- . प्रत्येक दिवशी सरासरी १० ते १२ रुग्णांना आहार समुपदेशन देऊन त्यांना आहार तक्ता देणे.
- वस्ती पातळीवर पोषक आहार शिबिरांचे आयोजन करणे व रुग्णांना समुपदेशन करणे.
- राष्ट्रीय आरोग्य विषयक दिवसांचे महत्व पटवण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे.
- शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्यासाठी आरोग्य विषयक चर्चासत्रे आयोजित करणे.
३. कार्यकारी सहाय्यकः
- असंसर्गजन्य रोग कक्षाशी निगडीत दैनंदिन प्रशासकीय कामे जसे की प्रस्ताव तयार करणे, प्रस्तावांचे टंकलेखन, आवक जावक, कार्यालयीन कामकाज, सामानाची खरेदी व वाटप याची नोंदणी.
- करार पद्धतीने भरलेल्या कंत्राटी कर्मचा-यांचे कार्यालयीन आदेश बनवून निर्गमित करणे तसेच प्रत्येकी १७९ दिवसांकरिता (६ महीने) व त्यानंतर १ दिवसाचा तांत्रिक कालखंड देऊन पुनःश्च सहा महिन्यांकरिता नियुक्ती आदेश बनवणे.
- एनसीडी विभागातील कंत्राटी कर्मचारी, आहारतज्ञ तसेच एनसीडी कॉर्नरमधील एमपीडब्ल्यू यांच्या मासिक मानधनाबाबतची कार्यवाही करणे.
- दरवर्षी अर्थसंकल्पीय प्रस्ताव बनवणे.
- अग्रधानाची देयके तयार करून रोख रक्कम ई विभागमधून स्विकारून त्याचे अधिदान करणे.
४. डेटा एंट्री ऑपरेटर :
- मधुमेह, आणि उच्च रक्तदाब या रुग्णांचा डेटा संगणकीय प्रणालीमध्ये भरणे.
- विविध दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक अहवाल तयार करणे.
- दर बुधवारी लोकसंख्या आधारित गूगल शीट अद्ययावत करणे.
- एनसीडी आयटी पोर्टल मध्ये उपनगरीय रुग्णालय, विशेष रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालये यांची नोंद घेणे
५. रुग्णालयातील एमपीडब्ल्यू :
- एनसीडी आयटी पोर्टलवर रुग्णांची नोंद घेणे.
- दर बुधवारी लोकसंख्या आधारित गूगल शीट अद्ययावत करणे.
- एनसीडी आयटी पोर्टल मध्ये उपनगरीय रुग्णालय, विशेष रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालये यांची नोंद घेणे.
- एनसीडी रजिस्टर मध्ये दैनंदिन अहवालाची नोंद घेणे.
- एनसीडी मधील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी तसेच विभागामधील कार्यक्रम समन्वयक यांच्या सहकार्याने उपक्रमांचे सक्षमीकरण करणे.
- रक्त चाचणी द्वारे मधुमेह आणि बी.पी. मशीन द्वारे उच्च रक्तदाबाची तपासणी करणे.