आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू, शाळा नोंदणी डायरेक्ट लिंक – RTE Admission 2025 26

Published On: December 29, 2024
Follow Us
RTE Admission 2025 26

RTE Admission 2025 26 : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यांना कळविले आहे.

RTE Admission 2025 26 शाळा नोंदणी सुरू

मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दि. १३-१२-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या V.C. तील निर्देशानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी आ.र.टी.ई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया (RTE Admission 2025 26) सुरु करण्याच्या अनुषंगाने शाळा नोंदणी (School Registration) आणि शाळा व्हेरिफिकेशन ची लिंक सुरु करण्यात आली आहे.

शाळा नोंदणी (RTE School Registration) नंतर अत्यंत महत्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशन असतो. तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा व्हेरिफिकेशन करताना योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेवर निश्चित करण्यात आली आहे.

तसेच शाळा मान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे) तरी सूचनांचे पालन करुन दिलेल्या कालावधीमध्ये शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी दिले आहे.

RTE 25 टक्के प्रवेश शाळा नोंदणी डायरेक्ट लिंक RTE School Registration

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने दि. १८-१२-२०२४ ते दि. ३१-१२-२०२४ या कालावधीत शाळा नोंदणी (School Registration) आणि शाळा व्हेरिफिकेशन ची लिंक सुरु करण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाईट : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया

Pariksha Pe Charcha 2025 Registration – Direct Link

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment