CM Fellowship Maharashtra 2025: मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज सुरू, पात्रता, मानधन आणि संपूर्ण माहिती

Published On: April 12, 2025
Follow Us
CM Fellowship Maharashtra 2025

महाराष्ट्र सरकारने CM Fellowship Maharashtra 2025 26 या वर्षासाठी ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ जाहीर केला आहे. या योजनेद्वारे निवड होणाऱ्या 60 तरुणांना गट-अ अधिकाऱ्यांच्या दर्जाने एक वर्ष शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. फेलोशिपसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, मानधन व संपूर्ण माहिती खाली वाचा.

उद्दिष्टे | CM Fellowship Maharashtra 2025 26

या योजनेचा उद्देश राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी देऊन त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव वाढवणे हा आहे.

  • राज्यातील सुशिक्षित, जागरूक आणि तंत्रज्ञान-अनुकूल तरुणांना शासनाच्या धोरण प्रक्रियेत सहभागी करून घेणे.
  • तरुणांच्या कल्पक विचारांना आणि नविन दृष्टिकोनाला प्रशासनात स्थान मिळवून देणे.
  • युवांमध्ये नेतृत्वगुण, सार्वजनिक प्रशासनातील समज आणि निर्णयक्षमता निर्माण करणे.
  • प्रशासनाच्या गती आणि परिणामकारकतेत सुधारणा करणे.
  • ग्रामीण व शहरी भागात नवकल्पनांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवणे.

मुख्यमंत्री फेलोशिप साठी पात्रता काय आहे? | Eligibility

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुण).
  • अनुभव: किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव. इंटर्नशिप, अप्रेंटीसशिप किंवा स्वयंरोजगाराचाही अनुभव ग्राह्य धरला जाईल.
  • भाषा कौशल्य: मराठी भाषेतील प्रावीण्य अनिवार्य. तसेच हिंदी व इंग्रजी भाषा समजणे आवश्यक.
  • तांत्रिक ज्ञान: संगणक व इंटरनेटचे मूलभूत ज्ञान आवश्यक.
  • वयोमर्यादा: अर्जाच्या शेवटच्या तारखेस 21 ते 26 वर्षे दरम्यान वय असावे.

फेलोंची कामकाजाची रूपरेषा

  • एकूण 60 फेलोंची निवड होणार.
  • प्रत्येक जिल्ह्यात 2 ते 3 फेलोंना नेमण्यात येईल.
  • फेलो एक वर्षासाठी जिल्हाधिकारी / जिल्हा परिषदेच्या अधीन कार्य करतील.
  • कार्यकाल: 12 महिने (वाढीची संधी नाही).
  • फेलो दर्जा: गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष.

CM fellowship Maharashtra Salary

  • दरमहा ₹56,100/- मानधन.
  • ₹5,400/- प्रवास भत्ता.
  • एकूण ₹61,500/- प्रतिमाह स्टायपेंड (छात्रवृत्तीच्या स्वरूपात).
  • शासकीय सेवा मानधारक म्हणून काही सवलतींचा लाभ.

शैक्षणिक भाग व प्रशिक्षण

  • IIT मुंबईच्या सहकार्याने Public Policy या विषयावर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
  • ऑफलाईन प्रशिक्षण: 3 टप्प्यांत IIT मुंबई येथे – प्रारंभी, 6 महिन्यानंतर, आणि शेवटी.
  • वर्षभर ऑनलाईन व्याख्याने – शनिवारी/रविवारी.
  • प्रशिक्षण पूर्ण करणे व उपस्थिती अनिवार्य आहे.
  • यशस्वी फेलोंना प्रमाणपत्र दिले जाईल.

इतर महत्त्वाचे मुद्दे

  • महिला फेलोंसाठी 1/3 आरक्षण.
  • यापूर्वी फेलोशिप केलेले उमेदवार पुन्हा अर्ज करू शकत नाहीत.
  • फील्डवर्क व शैक्षणिक कार्यक्रम दोन्ही पूर्ण करणे आवश्यक.
  • ओळखपत्र (आधार इत्यादी) अनिवार्य.
  • पात्रता निकषांचे काटेकोर पालन.

CM Fellowship Maharashtra 2025 Registration कसे अर्ज करावे?

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

  • उमेदवाराने mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
  • अर्ज शुल्क: ₹500/- फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
  • निवड प्रक्रिया:
    1. Online Objective Test (वस्तुनिष्ठ परीक्षा)
    2. Online निबंध लेखन – ठराविक विषयांवर
    3. मुलाखत (Interview) – मुंबई येथे प्रत्यक्ष
  • एकूण 210 जास्त गुण प्राप्त उमेदवार निबंधासाठी पात्र होतील व त्यातून अंतिम 60 उमेदवारांची निवड केली जाईल.

CM Fellowship Apply Online: https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

CM Fellowship Maharashtra Website : https://mahades.maharashtra.gov.in/

अधिक माहितीसाठी : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Maharashtra Anganwadi Bharti 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती

February 1, 2026
NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025

Leave a Comment