कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महत्त्वाची बैठक संपन्न, वेतनाचा प्रश्न लवकरच सुटणार Contract Workers Salary Issue

By Marathi Alert

Updated on:

Contract Workers Salary Issue : नवी मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत कंत्राटी तसेच रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर कामगार मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली.

या बैठकीस माजी खासदार तथा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे, कामगार विभागाचे अधिकारी, विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या १००८ कामगारांच्या वेतनाबाबत कामगार मंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वेतनाबाबत (Contract Workers Salary Issue) महत्वाचे निर्देश मंत्री महोदयांनी यावेळी दिले.

 तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

  • नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत महापालिका आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.
  • या समितीचा अहवाल लवकर महानगर पालिकेकडे सादर केला जाणार आहे.
  • या समितीच्या अहवालानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल, असे यावेळी मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती

नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न (Contract Workers Salary Issue) लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत नियमित; शासन आदेश

कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा विषय हा त्या त्या महानगर, नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याने आयुक्तांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करावा, अशा सूचना यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिल्या.

सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 414 जागा, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

सफाई कामगारांच्या वारसांसाठी राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

Leave a Comment

error: Content is protected !!