Important Notice for Pensioners संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
Important Notice for Pensioners
राज्यात सध्या अनेक निवृत्तीवेतनधारकांना बनावट फोन कॉल, मोबाइल मेसेज किंवा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून (जसे की WhatsApp) चुकीची माहिती देण्यात येत आहे. या माध्यमातून काही व्यक्ती असे सांगतात की, तुमचे निवृत्तीवेतन थांबू शकते किंवा ते सुरू करण्यासाठी, फरक मिळवण्यासाठी किंवा जादा रक्कम वसुली टाळण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. काही वेळा लिंक पाठवून ती उघडून माहिती भरायला सांगितले जाते. मात्र हे संपूर्ण खोटे आणि दिशाभूल करणारे असते. याबाबत सत्य काय आहे? सविस्तर पाहूया.
पण सत्य काय आहे?
Important Notice for Pensioners कोषागार कार्यालय कधीही फोन किंवा मोबाईल मेसेजद्वारे अशा प्रकारची माहिती देत नाही. निवृत्तीवेतनाशी संबंधित कोणताही निर्णय – ते सुरू करणे, थांबवणे, फरक अदा करणे किंवा जादा रक्कम वसूल करणे – यासाठी अधिकृत पत्रव्यवहार केला जातो. कोणत्याही परिस्थितीत कोषागार कार्यालयाचा कर्मचारी तुमच्या घरी येत नाही. कोषागारामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरिता पत्रव्यवहार केला जातो.
सावधगिरीचे उपाय:
- फोन पे, Google Pay, किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पैसे भरू नका.
- WhatsApp, SMS किंवा सोशल मिडियावरून आलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरू नका.
- अशा प्रकारचे कॉल, मेसेज किंवा माहिती मिळाल्यास लगेच तुमच्या संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधा.
- कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत मार्गांद्वारे माहिती घ्या.
अधिकाऱ्यांचे आवाहन
अधिदान व लेखा अधिकारी / कोषागार अधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा बनावट कॉल्स, मेसेजेस किंवा फॉर्म्सना बळी पडू नका. यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. योग्य वेळी सावध राहूनच तुम्ही तुमचे निवृत्तीवेतन सुरक्षित ठेवू शकता.
सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी फोन पे / गूगल पे/ ऑनलाईन रक्कम भरण्याच्या अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये. अशा प्रकारे दूरध्वनीद्वारे / मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास संबंधित कोषागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी/ कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.