लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ; शासन निर्णय डाउनलोड करा

Published On: April 2, 2026
Follow Us
Ladki Bahin Yojana e-KYC Deadline Extension

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, ई-केवायसी दुरुस्तीसाठी दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.

अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहे, ज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी ३० एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी शासन निर्णय

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC माध्यमातून दि.३१.१२.२०२५ पर्यंत Aadhaar Authentication व्दारे e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे.

तथापि, या योजनेंतर्गत सदर लाभार्थ्यांची जलदगतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रिय कार्यालयाकडून होत असल्याने ऑनलाईन e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि.३१.०३.२०२६ पर्यंत शासन परिपत्रक दि.०६.०२.२०२६ अन्वये उपलब्ध करुन देण्यात आली होती.

तथापि, तद्नंतरही योजनेच्या लाभार्थ्यांकडून ऑनलाईन e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची होत असलेली मागणी विचारात घेता, e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी संधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत दि.३१.१२.२०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, सदर प्रक्रिया पूर्ण करताना “लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे” याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी दि.३०.०४.२०२६ पर्यंत मुद्दतवाढ देण्यात येत आहे.

उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी शासन निर्णय डाउनलोड करा

महिला योजना

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment