Ladki Bahin Yojana February Installment: राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिनांक २७ फेब्रुवारीपासून तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभाग मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजना ई केवायसी (eKYC) पूर्ण केलेल्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे महिलांना आर्थिक बळकटी मिळत असून मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. महायुती सरकारच्या पुढाकारातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वीपणे पुढे जात आहे. राज्यातील महिलांचा वाढता विश्वास हेच या योजनेचे मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ई केवायसी आवश्यक
Ladki Bahin Yojana ekyc बंधनकारक करण्यात आली असून, ई केवायसी दुरुस्ती साठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे. शासनाने मोठा निधी मंजूर करून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ठोस पाऊल उचलले आहे.
लाडकी बहीण योजना हप्ता कसा व कोठे चेक करायचा?
लाडकी बहीण योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या वेबसाइटवर जाण्याची गरज नसते, कारण हा सन्मान निधी थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलवर आलेले बँकेचे SMS तपासा. पैसे जमा झाले की “DBT” किंवा “Government Credit” असा मेसेज येतो.
जर SMS आला नसेल तर तुम्ही तुमचे पासबुक अपडेट करून पाहू शकता. बँकेत जाऊन पासबुक प्रिंट केल्यावर त्या दिवशीची एंट्री दिसते आणि त्यामध्ये सरकारकडून आलेला हप्ता स्पष्ट दिसतो. तसेच ATM मधून मिनी स्टेटमेंट काढले तरी शेवटच्या ट्रान्झॅक्शनमध्ये पैसे जमा झाल्याची माहिती मिळते.
मोबाईल बँकिंग वापरत असाल तर तुमच्या बँकेच्या अॅपमध्ये लॉगिन करून account statement पाहू शकता. तिथेही हप्ता क्रेडिट झालेला दिसतो.
एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या योजनेचे पैसे फक्त त्या बँक खात्यात येतात जे आधारशी लिंक असते. त्यामुळे कधी कधी लोक दुसऱ्या खात्यात पैसे शोधतात पण प्रत्यक्षात रक्कम आधार लिंक असलेल्या खात्यात जमा झालेली असते.
जर अजूनही पैसे दिसत नसतील तर थोडा वेळ द्या, कारण वितरण प्रक्रिया २ ते ३ दिवस चालते. तरीही समस्या कायम असेल तर तुमच्या बँकेत किंवा संबंधित कार्यालयात चौकशी करणे योग्य ठरेल.
लाडकी बहिण योजनेच्या फेब्रुवारी महिन्यासाठी निधी मंजूर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी दिनांक 24 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार एकूण ₹3960 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये फेब्रुवारी 2026 महिन्याचा हप्ता वितरीत करण्यासाठी ₹277.26 कोटींचा निधी मंजूर करून संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे “Ladki Bahin Yojana” अंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फेब्रुवारी हप्ता वितरण प्रक्रिया संदर्भात शासनाने स्पष्ट केले आहे की, हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे संबंधित विभागाला देण्यात आला आहे. त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात थेट लाभ जमा केला जाईल तसेच प्रत्येक महिन्याला लाभ वितरणाचा आढावा घेतला जाईल, निधीचा योग्य वापर झाला का याची तपासणी केली जाईल यामुळे “Ladki Bahin Yojana” अधिक पारदर्शक आणि प्रभावीपणे राबवली जाईल.
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ
महिला व बाल विकास विभागाला काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पात्र महिलांची छाननी करूनच लाभ देणे आवश्यक आहे. तसेच, एकाच महिलेला इतर योजनांमधून दुहेरी लाभ मिळणार नाही याची खात्री करणे बंधनकारक आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेव्दारे दुस-यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घेण्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
विभागीय अधिकाऱ्यांना निधी वापरताना वित्तीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक महिन्याला खर्चाचा अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. यामुळे योजनेचा निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि गैरवापर टाळता येईल.
अधिक माहितीसाठी: लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूरीचा शासन निर्णय डाउनलोड करा








