Ladki Bahin Yojana Loan: महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजना अंतर्गत राज्यातील महिलांना मुंबई बँकेमार्फत १० ते २५ हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल तसेच त्यांना लघु आणि मध्यम उद्योग सुरू करण्याची संधी मिळणार आहे.
Table of Contents
लाडकी बहीण योजनेतून 25 हजार पर्यंतचे कर्ज Ladki Bahin Yojana Loan
या योजनेच्या मदतीने महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतील. लघु उद्योग, गृहउद्योग, सेवा क्षेत्र तसेच इतर व्यावसायिक उपक्रमांसाठी महिलांना कर्जाचा आधार मिळणार आहे. या माध्यमातून महिलांना सक्षम करून संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
राज्य शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या बँका आणि वित्तीय संस्थांशी समन्वय साधला आहे. त्यामुळे लवकरच लाभार्थी महिलांना कर्जाचे वाटप सुरू होणार असून, Ladki Bahin Yojana Loan Scheme ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
महिलांसाठी मोठी संधी!
राज्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा सहकारी बँका आणि इतर सहकारी बँकांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाची मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे महिलांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल.
या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ, हा विश्वास बहिणींना देत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपयांची थेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल शासनाने उचलले आहे.
उपमुख्यमंत्री म्हणाले, “ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर महिलांचे सक्षमीकरण आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून सुमारे ४५ हजार कोटी रुपये वर्षाला महिलांच्या हाती जाणार आहेत, जे संपूर्ण राज्याच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावतील.”
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26: विकसित भारतासाठी महत्त्वाचा टप्पा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देशांच्या श्रेणीत नेण्याचा निर्धार केला आहे. या दिशेने महाराष्ट्रानेही कंबर कसली असून, राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 हा विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप म्हणून समोर आला आहे. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाद्वारे राज्याच्या संतुलित विकासाची हमी दिली आहे.
महत्त्वाचे प्राधान्यक्रम
✅ अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा – राज्याच्या दळणवळण सुविधांसाठी विशेष निधी, अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखड्याचा समावेश.
✅ कृषी आणि शेतकरी विकास – कृषी क्षेत्रात 9,700 कोटींची तरतूद, पीक नियोजनासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर, मोफत वीज, शेतकरी अनुदाने.
✅ उद्योग आणि गुंतवणूक – “मेक इन महाराष्ट्र” धोरणांतर्गत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य.
✅ महिला सक्षमीकरण – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत महिलांसाठी 1500 रुपये मासिक मदत आणि विशेष कर्जसुविधा. (Ladki Bahin Yojana Loan)
✅ आर्थिक सुधारणा – 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य, वाढता जीएसटी महसूल, वित्तीय शिस्तीचे पालन.
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पावले
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे “विकसित भारत, विकसित महाराष्ट्र” ही संकल्पना वास्तवात उतरण्यास मदत होणार आहे.