Maharashtra School New Time Table: राज्यातील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या आहेत. याबाबतचे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी नवीन वेळापत्रक काढण्यात आले आहे.
Table of Contents
शाळांच्या वेळा बदलल्या! आता सकाळीच भरणार
राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात, महसूल व वन विभागाने यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा स्तरावर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते.
विविध संघटनांनी देखील शाळेची वेळ सकाळची करण्याची मागणी केली होती आणि काही जिल्ह्यांनी यापूर्वीच असे आदेश काढले होते. परंतु, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेळापत्रकात भिन्नता असल्याने, राज्यभर एकसमानता आणणे आवश्यक होते. यासाठी शिक्षण विभागाने राज्यस्तरावरून हा निर्णय घेतला आहे.
हे आहे नवीन वेळापत्रक: Maharashtra School New Time Table
प्राथमिक शाळा सकाळी ७:०० ते ११:१५ पर्यंत आणि माध्यमिक शाळा सकाळी ७:०० ते ११:४५ पर्यंत भरतील, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, शाळांमध्ये खालील वेळापत्रक असेल
प्राथमिक शाळा:
- सकाळी ७:०० ते ७:१५: परिपाठ
- सकाळी ७:१५ ते ७:४५: तासिका १
- सकाळी ७:४५ ते ८:१५: तासिका २
- सकाळी ८:१५ ते ८:४५: तासिका ३
- सकाळी ८:४५ ते ९:१५: तासिका ४
- सकाळी ९:१५ ते ९:४५: भोजन/सुट्टी
- सकाळी ९:४५ ते १०:१५: तासिका ५
- सकाळी १०:१५ ते १०:४५: तासिका ६
- सकाळी १०:४५ ते ११:१५: तासिका ७
Also Read: CBSE Pattern Maharashtra: राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम अशा पद्धतीने लागू होणार
माध्यमिक शाळा
- सकाळी ७:०० ते ७:१५: परिपाठ
- सकाळी ७:१५ ते ७:४५: तासिका १
- सकाळी ७:४५ ते ८:१५: तासिका २
- सकाळी ८:१५ ते ८:४५: तासिका ३
- सकाळी ८:४५ ते ९:१५: तासिका ४
- सकाळी ९:१५ ते ९:४५: भोजन/सुट्टी
- सकाळी ९:४५ ते १०:१५: तासिका ५
- सकाळी १०:१५ ते १०:४५: तासिका ६
- सकाळी १०:४५ ते ११:१५: तासिका ७
- सकाळी ११:१५ ते ११:४५: तासिका ८
स्थानिक परिस्थितीनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने वेळेत बदल संभवू शकतो. यासोबतच, उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत.
Also Read: महाराष्ट्रातील शाळांमध्ये सीबीएसईसारखा अभ्यासक्रम – शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रमात मोठा बदल!

विद्यार्थ्यांसाठी सूचना
- उन्हाळ्यात मैदानी खेळ किंवा शारीरिक हालचाली टाळाव्यात.
- उष्णतेपासून बचाव कसा करावा, याबद्दल माहिती घ्यावी.
- वर्गात पंखे व्यवस्थित आहेत का, याची खात्री करावी.
- पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध ठेवावे.
- टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी यांसारखी फळे आणि भाज्या खाव्यात.
- पातळ, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे.
- डोक्याला छत्री, टोपी किंवा तत्सम वस्तूने झाकावे.
- उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावे.
- शक्यतोवर उन्हात बाहेर जाणे टाळावे.
शिक्षण विभागाने हे परिपत्रक राज्यातील सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.

