फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या बोर्डाच्या परीक्षा आता जवळ येत आहेत. परीक्षेचा काळ जवळ आला की विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढते, आणि त्यातच सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती किंवा अफवा पसरण्याचे प्रमाणही वाढते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (MSBSHSE) यांनी विद्यार्थी आणि पालकांना अधिकृत माहिती मिळावी यासाठी Maharashtra State Board Official Website Social Media Links यादी जाहीर केली आहे.
MSBSHSE बोर्डाने नुकतेच त्यांचे अधिकृत संकेतस्थळ (Website), मोबाईल ॲप आणि विविध सोशल मीडिया हँडल्सची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही अचूक आणि खात्रीशीर माहितीसाठी (Maharashtra State Board Official Social Media Links) शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
अधिकृत सोशल मीडिया हँडल्स का जॉईन करावेत?
बोर्डाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेच्या काळात बोर्डामार्फत ज्या काही महत्त्वाच्या सूचना किंवा बदल असतील, ते आता थेट या अधिकृत माध्यमांवरून प्रसारित केले जातील.
त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, थेट बोर्डाकडून येणाऱ्या माहितीवर अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या चॅनेल्सना सबस्क्राईब करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
Maharashtra State Board Official Social Media Links
तुम्ही खालीलप्रमाणे (Maharashtra State Board Official Social Media Links) वर क्लिक करून बोर्डाशी थेट जोडले जाऊ शकता:
- अधिकृत संकेतस्थळ (Website): www.mahahsscboard.in
- YouTube चॅनेल: @Maharashtra_State_Board
- मोबाईल ॲप (Android): MSBSHSE Official App
- WhatsApp चॅनेल: Maharashtra State Board WhatsApp
- Instagram अकाउंट: @msbshse
- Facebook पेज: MSBSHSE Pune
- Twitter (X) हँडल: @msbshse
शाळा आणि महाविद्यालयांसाठी सूचना
राज्य मंडळाने सर्व शाळांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना विनंती केली आहे की, त्यांनी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या लिंक्सबद्दल माहिती द्यावी आणि त्यांना हे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स सबस्क्राईब करण्यास सांगावे. यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेच्या काळात वेळेवर आणि योग्य माहिती पोहोचणे सोपे होईल.
मित्रांनो, डिजिटल युगात माहितीचा प्रवाह प्रचंड आहे, पण त्यातील ‘खरी’ माहिती ओळखणे गरजेचे आहे. महाराष्ट्र बोर्डाने हे अधिकृत व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे आता विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर होईल. त्यामुळे आजच वर दिलेल्या (Maharashtra State Board Official Social Media Links) ला भेट द्या आणि अपडेट रहा. ही माहिती तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांसोबतही नक्की शेअर करा!









