Maharashtra State Govt Employees: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत महत्वाची बैठक नुकतीच मंत्रालय मुंबई येथे संपन्न झाली या बैठकीत महागाई भत्ता वाढ, सेवानिवृत्ती वय, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या बाबत सविस्तर चर्चा करून राज्याचे मुख्य सचिव यांनी महत्वाचे निर्देश दिले आहे.
बैठकीतील मुख्य मुद्दे | Maharashtra State Govt Employees
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या संदर्भात मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या समवेत झालेल्या दिनांक 24 जून 2024 रोजी विविध निर्णय घेण्यात आले आहे.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ दिनांक 1 मार्च 2024 पासून मिळणार
National Pension Scheme : सदर बैठकीमध्ये दि. १ मार्च २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मा. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची (NPS) अधिसूचना व त्यासंबंधी विस्तृत शासकीय निर्णय अद्याप पारित करण्यात आलेला नाही. त्यामुळे चालू काळात निवृत होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यासंदर्भात मा. मुख्य सचिव यांनी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले असून, सदर लाभ कर्मचाऱ्यांना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के होणार
Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जानेवारी 2024 पासून राज्यातील कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्यात (DA) वाढ देण्यात यावी. तसेच या 4% महागाई भत्तावाढीमुळे एकूण महागाई भता मूळ वेतनाच्या 50% इतका होणार आहे. त्यामुळे त्याचा अनुषंगिक परिणाम म्हणून, घरभाडे भत्त्यात कमाल 3% ची वाढ होणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही दि.1 जानेवारी 2024 च्या महागाई भत्ता वाढीसोबत करावी, याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी फॉर्म मागे ‘इतके’ रुपये
कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करण्याची मागणी
Retirement Age : देशातील इतर 25 राज्यांनी अनुसरलेल्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्यात सेवानिवृत्तीचे वय (Retirement Age) 60 वर्ष करण्यात यावे. गेली काही वर्षे या मागणीबाबत शासनाचा ठाम विरोध दिसला नाही परंतु या संबंधातील प्रत्यक्ष निर्णय सुद्धा घेतला जात नाही ही बाब अनाकलनीय आहे. यासंदर्भात सदर प्रस्ताव मा. मुख्यमंत्री महोदयांकडे सादर असल्याचे सांगण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि सर्व भत्त्यांमध्ये भरीव वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय!
कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत कार्यवाही सुरु होणार
Employees Transfers: सन 2024 या वर्षातील, वार्षिक नियतकालीन तसेच विनंती बदल्यांचे सत्र तत्काळ सुरु करण्यात यावे, लोकसभा निवडणूक आचार संहितेमुळे मे 2024 मध्ये बदल्या होऊ शकल्या नाहीत. यासंदर्भात मा. मुख्य सचिवांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.
अधिक माहितीसाठी : सविस्तर बैठकीचे इतिवृत्त पाहा