महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (State CET Cell) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश परीक्षांबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी तुम्ही तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. सीईटी सेलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या MHT CET Public Notice द्वारे नोंदणी प्रक्रियेतील काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. सविस्तर पाहूया.
MHT CET 2026 Public Notice आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ च्या सीईटी नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी काही कागदपत्रे आणि आयडी अनिवार्य करण्यात आले आहेत.
नवीन नियमावलीनुसार, २०२६ च्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ‘आधार ऑथेंटिकेशन’ (Aadhaar Authentication) बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ आधार कार्ड असून चालणार नाही, तर त्यावरील माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी खालील बाबी तपासून घ्याव्यात.
- स्वतःचे नाव आणि जन्मतारीख (इयत्ता १० वीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच असावी).
- अद्ययावत फोटो (Latest Photograph).
- पत्ता आणि वडिलांचे नाव.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आणि तो ॲक्टिव्ह असणे अनिवार्य आहे.
APAAR ID आवश्यक
यावर्षीच्या MHT CET Public Notice मध्ये ‘APAAR ID’ (Automated Permanent Academic Account Registry) बाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.
सीईटीला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेसाठी आपला APAAR ID जनरेट करून ठेवावा लागेल, कारण फॉर्म भरताना याची आवश्यकता भासणार आहे.
दिव्यांग उमेदवारांसाठी (PwD) महत्त्वाच्या सूचना
दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाचे अपंगत्व प्रमाणपत्र किंवा युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड अपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच, ज्या पात्र दिव्यांग उमेदवारांना परीक्षेसाठी लेखकाची (Scribe) गरज आहे, त्यांना ऑनलाईन अर्ज करतानाच दोन लेखकांची (Scribes) माहिती सादर करावी लागेल.
यामध्ये लेखकाचे नाव, आधार, फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र या गोष्टींचा समावेश आहे.
सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ही सूचना जारी केली असून, विद्यार्थ्यांनी वेळेवर होणारी धावपळ टाळण्यासाठी आपली कागदपत्रे आताच तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत वेळापत्रक आणि सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी. या नवीन MHT CET Public Notice मुळे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी : Important Notice Regarding Aadhaar Authentication, APAAR ID Generation, and UDID (for PwD Candidates) for CET Registration A.Y.2026-27 Download Here
















