MHT CET Cell Clarification : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (cetcell.mahacet.org) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या MBA MMS CET 2025 व अभियांत्रिकी सामाईक प्रवेश परीक्षांबाबत काही गैरप्रकारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी उमेदवारांना अवांछित (स्पॅम) कॉलद्वारे पर्सेंटाईल वाढवून देण्याचे आमिष दाखवले. याबाबत तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे. MHT CET Cell कक्षाकडून महत्वाचे Clarification देण्यात आले आहे.
Table of Contents
MHT CET Cell Clarification सीईटीकक्षाकडून स्पष्टीकरण
काही समाजमाध्यमांवर विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित नाही असे संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी पालक यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होऊ शकते अशा समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे सीईटीकक्षाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
मागील वर्षांचे ट्रेंड नुसार, बोर्ड परीक्षा निकाल या तारखेला जाहीर होणार
विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचे सूचना
सामाजिक माध्यमांवर परीक्षा संबंधित दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असून यात “विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित नाही” असा अपप्रचार केला जात आहे. यासंदर्भात सीईटी कक्षाने स्पष्टीकरण देत परीक्षा संपूर्ण पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याचे सांगितले आहे.
CET Cell Schedule 2025 26 : MHT CET 2025 All Exam Date
MHT CET Exam 2025 उपाययोजना
१. प्रवेशपत्र पडताळणी: उमेदवारांच्या प्रवेशपत्राची पडताळणी क्युआर कोडच्या माध्यमातून केली जात आहे.
2. बायोमेट्रिक आणि फेशियल रेकग्निशन: परीक्षा केंद्रावर उमेदवारांची बायोमेट्रिक उपस्थिती व चेहरा पडताळणी करण्यात येईल.
3. सीसीटीव्ही आणि लाईव्ह मॉनिटरिंग: प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही बसवले असून, परीक्षेचे लाईव्ह स्ट्रिमिंग सीईटी कक्षामार्फत तपासले जात आहे.
4. बॉडी कॅम सुविधा: पर्यवेक्षकांना बॉडी कॅम देण्यात आले असून परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
MHT CET Free Mock Test 2025: Coursewise Mocktest Direct link
5. ओळखपत्र पडताळणी: उमेदवारांना आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यासारखे वैध ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे.
6. सहसंचालक आणि समन्वय अधिकारी नेमणूक: परीक्षा केंद्रांवर शिस्तबद्धता राखण्यासाठी सहसंचालक आणि जिल्हा समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
7. भरारी पथकांची तपासणी: सर्व जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त असून परीक्षा केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
परीक्षा वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांसाठी सूचना
MBA/MMS CET 2025 सामाईक प्रवेश परीक्षा: 📅 १, २ आणि ३ एप्रिल २०२५ ⏰ सकाळी ९.०० – ११.३० आणि दुपारी २.०० – ४.३० 🏛 १७४ परीक्षा केंद्रे (महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर) 👨🎓 एकूण उमेदवार: १.५७ लाख
सुरक्षित आणि शांततामय परीक्षेसाठी अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
MHT CET Hall Ticket 2025: परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध! हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्ट लिंक
विद्यार्थी व पालकांनी काय करावे?
✅ अधिकृत सीईटी पोर्टल आणि विश्वसनीय स्रोतांकडूनच माहिती घ्या. ✅ कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ✅ परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास अधिकृत सीईटी हेल्पलाईनशी संपर्क साधा.
सीईटी परीक्षा कक्षाकडून विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, तणावमुक्त राहून परीक्षेची तयारी करा आणि कोणत्याही भ्रामक माहितीला बळी पडू नका!
अधिकृत अपडेटसाठी भेट द्या: https://cetcell.mahacet.org/