MHT CET OBJECTION TRACKER Notice महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी M.Ed, M.P.Ed आणि B.Ed-M.Ed या अभ्यासक्रमांच्या परीक्षेसंदर्भात Objection Tracker सुरू करण्याची घोषणा केली आहे. उमेदवारांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्न किंवा उत्तरसूचीवरील (Answer Key) उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
Table of Contents
MHT CET OBJECTION TRACKER Notice
उमेदवारांचे उत्तरपत्र, उमेदवारांनी दिलेली उत्तरे आणि अधिकृत उत्तरसूची (Answer Key) 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 दरम्यान उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध असणार आहे. प्रत्येक आक्षेपासाठी ₹1000/- शुल्क आकारले जाणार असून, आक्षेप फक्त ऑनलाइन उमेदवार लॉगिनद्वारेच नोंदवता येणार आहे. ई-मेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून दिलेल्या तक्रारी मान्य केली जाणार नाहीत.
OBJECTION TRACKER Schedule
OBJECTION TRACKER for Courses under Higher Education for AY 2025-26 (MEd, MPEd & BEd-MEd)
- M.Ed साठी Objection Tracker सुरु: 21 एप्रिल 2025, शेवटची तारीख: 23 एप्रिल 2025
- M.P.Ed साठी Objection Tracker सुरु: 21 एप्रिल 2025, शेवटची तारीख: 23 एप्रिल 2025
- B.Ed-M.Ed साठी Objection Tracker सुरु: 21 एप्रिल 2025, शेवटची तारीख: 23 एप्रिल 2025
आक्षेप कसा नोंदवायचा?
- CET CELL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://cetcell.mahacet.org/
- उमेदवार लॉगिनद्वारे प्रवेश करा.
- संबंधित परीक्षेच्या Objection Tracker मध्ये जा.
- संबंधित प्रश्नावर आक्षेप नोंदवा व ₹1000/- शुल्क भरून सबमिट करा.
MAH CET Hall Ticket 2025 जाहीर – येथे करा लगेच डाउनलोड!
