MPSC Exam Hall Ticket 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आयोगाने दिनांक 10 मे 2025 रोजी होणाऱ्या विविध संवर्गांच्या संगणक आधारित चाळणी परीक्षांसाठी उमेदवारांची प्रवेशपत्रे mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहेत.
MPSC Exam Hall Ticket 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १० मे, २०२५ रोजी नियोजित खाली नमूद संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
- परीक्षा कक्षात प्रवेश परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदरच मिळेल. उशिरा आलेल्यांना प्रवेश नाकारण्यात येईल.
- आयोगाच्या वेबसाइटवरील सर्वसामान्य सूचना, प्रवेशपत्रावरील मार्गदर्शक सूचना आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
कोणत्या पदांसाठी होणार परीक्षा?
10 मे 2025 रोजी खालील संवर्गांसाठी संगणक आधारित चाळणी परीक्षा होणार आहे:
- प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक – महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा (गट अ)
- सहायक प्राध्यापक – आयुर्वेदिक सेवा (गट ब)
- उप संचालक (माहिती) – गट अ (वरिष्ठ)
- वरिष्ठ सहायक संचालक / जिल्हा माहिती अधिकारी / जनसंपर्क अधिकारी – गट अ (कनिष्ठ)
- सहायक संचालक (माहिती) / अधिपरिक्षक / माहिती अधिकारी – गट ब
मॉक टेस्टची सुविधा
उमेदवारांना परीक्षेपूर्वी सराव करता यावा यासाठी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर मॉक टेस्टची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लिंक: https://mpsc.gov.in > Online Facilities > Computer Based Examinations > Mock Test
अडचण आल्यास संपर्क करा
प्रवेशपत्र डाउनलोड करताना तांत्रिक अडचण आल्यास, खालील माध्यमांद्वारे मदतीसाठी संपर्क साधू शकता:
- Email: contact-secretary@mpsc.gov.in / support-online@mpsc.gov.in
- Phone: 7303821822 / 022-69123914
अपडेट्ससाठी भेट द्या: https://mpsconline.gov.in आणि https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

