सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 3,11 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध  – MPSC Pasusavardhan Sahayyak Ayukt Bharti 2025

Published On: June 4, 2025
Follow Us
MPSC Pasusavardhan Sahayyak Ayukt Bharti 2025

MPSC Pasusavardhan Sahayyak Ayukt Bharti 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील 3,11 रिक्त पदे भरण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची तारीख ९ जून २०२५ पर्यंत आहे.

MPSC Pasusavardhan Sahayyak Ayukt Bharti 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत 2,795 पदांची मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आता ‘सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’ या संवर्गातील 3,11 पदांच्या भरतीसाठी जाहिरात (क्रमांक १०५/२०२५) प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त पदांचा तपशील

  • पदाचे नाव: सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’
  • वेतनश्रेणी: स्तर एस-२२ रुपये ६०,०००/- ते रुपये १,९०,८००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
  • एकूण रिक्त जागा: 3,11

पदांची संख्या आणि आरक्षण: एकूण ३११ पदांपैकी २१९ पदे आरक्षित असून, ९२ पदे अराखीव (खुला) प्रवर्गासाठी आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी २०४ पदे, महिलांसाठी ९३ पदे, खेळाडूंसाठी १४ पदे आणि अनाथांसाठी ३ पदे आरक्षित आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण १२ पदे आरक्षित असून, यामध्ये अंध/अल्पदृष्टी (०३), कर्णबधीरता (०३), अस्थिव्यंगता/शारीरिक वाढ खुंटणे/आम्ल हल्लाग्रस्त (०३), आणि स्वमग्नता/मंदबुद्धी/मानसिक आजार व एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व (०३) यांचा समावेश आहे. पदसंख्या आणि आरक्षणात शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी: २० मे, २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते ०९ जून, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत.
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत: ०९ जून, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत.
  • चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक: ११ जून, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत.
  • चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत (बँकेत): १२ जून, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत.

वयोमर्यादा (०१ सप्टेंबर, २०२५ रोजी):

  • किमान वय: १८ वर्षे.
  • कमाल वय:
    • अराखीव (खुला): ३८ वर्षे.
    • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ४३ वर्षे.
    • प्राविण्य प्राप्त खेळाडू: ४३ वर्षे.
    • माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी: सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ३ वर्षे.
    • दिव्यांग उमेदवार: ४५ वर्षे. महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी उच्च वयोमर्यादा लागू नाही.

शैक्षणिक अर्हता आणि अनुभव:

  • शैक्षणिक अर्हता: पशुवैद्यक शास्त्रातील स्नातकोत्तर पदवी.
  • अनुभव: पदवी संपादन केल्यानंतर शासकीय विभाग किंवा औद्योगिक उपक्रमातील पशुसंवर्धनाचा किमान पाच वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पुरेशा प्रमाणात उमेदवार उपलब्ध नसल्यास अनुभवाचा कालावधी ४० टक्क्यांपर्यंत शिथिल केला जाऊ शकतो.
  • शैक्षणिक अर्हता आणि अनुभव अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण असावा.
  • राज्य पशुवैद्यक परिषद / भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा, १९८४ / महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९७१ अन्वये नोंदणी असणे आणि नोंदणी क्रमांक अर्जात नमूद करणे अनिवार्य आहे.

अर्ज शुल्क:

  • अराखीव (खुला): रुपये ७१९/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग: रुपये ४४९/- बँक चार्जेस आणि त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क नॉन-रिफंडेबल (परत न मिळणारे) आहे.

अर्ज करण्याची पध्दत – अर्ज सादर करण्याचे टप्पे

  • आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापुर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे.
  • खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
  • विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
  • विहित प्रमाणपत्र/कागदपत्रे अपलोड करणे.
  • प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवाराची पात्रता अजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करावी लागतील.
MPSC Pasusavardhan Sahayyak Ayukt Bharti Document 2025

निवड प्रक्रिया: अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा चाळणी परीक्षा घेतली जाईल. चाळणी परीक्षा झाल्यास, चाळणी परीक्षेचे आणि मुलाखतीचे गुण एकत्रित विचारात घेतले जातील, अन्यथा केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे शिफारस केली जाईल. मुलाखतीमध्ये किमान ४१% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.

महत्वाचे मुद्दे:

  • कोणत्याही आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच मिळेल.
  • अर्जासोबत आवश्यक ती प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • दिव्यांग उमेदवारांनी स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID Card) सादर करणे अनिवार्य आहे.
  • अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सुधारित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र आणि महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • परीक्षेच्या ठिकाणी मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास सक्त मनाई आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस/नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ:- https://mpsconline.gov.in
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

मूळ जाहिरात येथे डाउनलोड करा

MPSC Official Website : https://mpsc.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025
BMC Peon Recruitment

मुंबई उच्च न्यायालयात 887 पदांसाठी मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध

December 10, 2025

Leave a Comment