Revised pay scale महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील खाजगी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (Assurance Progress Scheme) लागू करण्यात आली आहे, ज्यात त्यांना २ लाभांची सुधारित वेतनश्रेणी मिळेल. हा निर्णय १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आला आहे
या शासन निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबत असलेल्या शंका दूर झाल्या आहेत. या योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्यांची मूळ वेतनश्रेणी, १२ वर्षांनंतरची वेतनश्रेणी आणि २४ वर्षांनंतरची वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे आहेत:
अधीक्षक: मूळ वेतनश्रेणी ₹38,600-1,22,800 (लेव्हल 14). 12 वर्षांनंतर ₹41,800-1,32,300 (लेव्हल 15).
ग्रंथपाल (पदवीधर): मूळ वेतनश्रेणी ₹29,200-92,300 (लेव्हल 10). 12 वर्षांनंतर ₹30,100-95,100 (लेव्हल 11). 24 वर्षांनंतर ₹32,000-1,01,600 (लेव्हल 12).
ग्रंथपाल (अशासकीय माध्यमिक शाळेतील): मूळ वेतनश्रेणी ₹25,500-81,100 (लेव्हल 8). 12 वर्षांनंतर ₹26,400-83,600 (लेव्हल 9). 24 वर्षांनंतर ₹29,200-92,300 (लेव्हल 10).
मुख्य लिपिक: मूळ वेतनश्रेणी ₹35,400-1,12,400 (लेव्हल 13). 12 वर्षांनंतर ₹38,600-1,22,800 (लेव्हल 14). 24 वर्षांनंतर ₹41,800-1,32,300 (लेव्हल 15).
वरिष्ठ लिपिक: मूळ वेतनश्रेणी ₹25,500-81,100 (लेव्हल 8). 12 वर्षांनंतर ₹35,400-1,12,400 (लेव्हल 13). 24 वर्षांनंतर ₹38,600-1,22,800 (लेव्हल 14).
प्रयोगशाळा सहायक: मूळ वेतनश्रेणी ₹21,700-69,100 (लेव्हल 7). 12 वर्षांनंतर ₹25,500-81,100 (लेव्हल 8). 24 वर्षांनंतर ₹26,400-83,600 (लेव्हल 9).
कनिष्ठ लिपिक: मूळ वेतनश्रेणी ₹19,900-63,200 (लेव्हल 6). 12 वर्षांनंतर ₹25,500-81,100 (लेव्हल 8). 24 वर्षांनंतर ₹35,400-1,12,400 (लेव्हल 13).
प्रयोगशाळा परिचर: मूळ वेतनश्रेणी ₹19,900-63,200 (लेव्हल 6). 12 वर्षांनंतर ₹21,700-69,100 (लेव्हल 7). 24 वर्षांनंतर ₹25,500-81,100 (लेव्हल 8).
नाईक: मूळ वेतनश्रेणी ₹16,600-52,400 (लेव्हल 3). 12 वर्षांनंतर ₹17,100-54,000 (लेव्हल 4). 24 वर्षांनंतर ₹18,000-56,900 (लेव्हल 5).
शिपाई: मूळ वेतनश्रेणी ₹15,000-47,600 (लेव्हल 1). 12 वर्षांनंतर ₹16,600-52,400 (लेव्हल 3). 24 वर्षांनंतर ₹17,100-54,000 (लेव्हल 4).
हा शासन निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा