Youth Skill Training पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘कौशल्य, रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा’ साजरा होणार. 75,000 तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून राज्यात ‘कौशल्य, रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा’ सुरू होत आहे.
या उपक्रमांतर्गत सुमारे ७५ हजार युवक-युवतींना अत्याधुनिक कौशल्ये शिकण्याची संधी मिळणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली.
हा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत चालणार असून, राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये १ ऑक्टोबरपासून अभ्यासक्रमांना सुरुवात होईल.
अत्याधुनिक अभ्यासक्रमांची ओळख
केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुणांनाही रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या उद्देशाने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
आयटीआयमधील नियमित वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत हे अल्पकालीन अभ्यासक्रम चालवले जातील. यात रोबोटिक, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, जे विद्यार्थी सध्या आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत आहेत, त्यांना या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
प्रवेश कसा घ्याल?
या अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. या वेबसाइटवर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आणि प्रवेश प्रक्रिया दिली आहे. स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार प्रशिक्षण दिल्याने तरुणांना रोजगार शोधण्यासाठी आपला जिल्हा सोडून बाहेर जाण्याची गरज राहणार नाही.
ऑनलाईन अर्ज आणि जिल्हानिहाय सविस्तर माहितीची डायरेक्ट लिंक



