Anganwadi Sevika May Salary: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मे २०२६ या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा महिला व बाल विकास विभागाने २७ मे २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हा GR डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मे २०२६ या महिन्याच्या मानधनासाठी १७४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना असून, या योजनेअंतर्गत गाव आणि शहर पातळीवर कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी शासनाने हा १००% अतिरिक्त राज्य हिस्सा मंजूर केला आहे.
पोषण ट्रॅकर नवीन अपडेट येथे पाहा
मंजूर करण्यात आलेला हा १७४ कोटी रुपयांचा (एकशे चौऱ्याहत्तर कोटी फक्त) निधी ‘विशेष पोषण आहार कार्यक्रम’ आणि ‘अंगणवाडी सेवा’ या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, सदर निधी वितरित व खर्च करण्याचे सर्व अधिकार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत.
हा निधी खर्च करताना वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून विहित पद्धतीने कार्यवाही पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, या GR मुळे आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मे २०२६ या महिन्याचे मानधन वेळेवर होण्याचा मार्ग मोकळा आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधन आणि प्रोत्साहन भत्ता शासन निर्णय येथे डाउनलोड करा






