बीएलओ कर्मचारी अधिकारी यांचे मानधन मंजूर, शासन निर्णय जारी

Published On: July 29, 2026
Follow Us
BLO Duty Allowance GR

भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेसाठी राज्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer – BLO) आणि BLO Supervisor यांना प्रत्येकी ₹6,000 इतके एकवेळचे (One Time Honorarium) मानधन देण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय (Government Resolution – GR) सामान्य प्रशासन विभागाने 28 जुलै 2026 रोजी जारी केला.

मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये Special Intensive Revision (SIR) कार्यक्रम सुरू केला आहे. या मोहिमेत BLO आणि BLO Supervisor यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

या मोहिमेदरम्यान BLO हे मतदारांच्या घरोघरी जाऊन Enumeration Form वाटप करणे, भरलेले फॉर्म स्वीकारणे, मतदारांची माहिती पडताळणे आणि त्यांचे डिजिटायझेशन (Digitization) करणे अशी कामे करत आहेत. तसेच BLO Supervisor हे या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवून काम वेळेत आणि अचूक पद्धतीने पूर्ण होईल याची जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे ही अतिरिक्त कामे ते त्यांच्या नियमित शासकीय कामकाजासोबतच करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने BLO आणि BLO Supervisor यांना प्रत्येकी ₹6,000 इतके एकवेळचे मानधन मंजूर केले असून, त्यानुसार महाराष्ट्र शासनानेही या मानधनाला अधिकृत मंजुरी दिली आहे. हे मानधन संबंधित अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या नियमित मानधनाव्यतिरिक्त दिले जाणार आहे.

शासन निर्णयानुसार या मानधनावरील खर्च 2026-27 या आर्थिक वर्षातील निवडणूक विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून करण्यात येणार आहे.

BLO Duty Allowance GR Download Here

BLO वाढीव मानधन GR

BLO Duty Allowance GR
BLO Duty Allowance GR

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment