एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत (ICDS) कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWWs) आणि अंगणवाडी मदतनीस (AWHs) यांच्या बदल्यांना महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याची तपासणी करणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ दिला जात आहे.
हा शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला होता. काय आहे सत्य सविस्तर पाहूया..
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बदल्यांना मंजुरी दिल्याचा दावा खोटा
महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बदल्यांना मंजुरी दिल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा खोटा असल्याचे जाहीर केले आहे.
दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये “एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती ही स्थानिक समुदायातून करणे आवश्यक आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या स्थानिक क्षेत्रातील रहिवाशी असल्यामुळे त्यांना समुदायाची स्वीकृती असते. त्यामुळे त्यांचा समुदायाशी परिचय असल्याने त्यांचेकडून योजनेविषयी देण्यात येणाऱ्या माहितीला/मार्गदर्शनाला समुदायाचा प्रतिसाद मिळतो.
त्यामुळे योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या करता येते. सबब, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना बदली अनुज्ञेय राहणार नाही.” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने ९ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बदलीबाबत केलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत.
स्थानिक समुदायाची गरज: शासन निर्णयानुसार, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती ही स्थानिक समुदायातून करणे आवश्यक आहे. कारण त्या स्थानिक क्षेत्रातील रहिवाशी असल्यामुळे त्यांना समुदायाची स्वीकृती मिळते.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समुदायाशी परिचय असल्याने, त्यांच्याकडून योजनेविषयी देण्यात येणाऱ्या माहितीला/मार्गदर्शनाला समुदायाचा उत्तम प्रतिसाद मिळतो. यामुळे, ICDS योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या करता येते. केंद्र शासनाच्या धोरणानुसार देखील अंगणवाडी सेविका व मदतनीस या स्थानिक असणेच योग्य आहे.
बदली ना-मंजूर: उपरोक्त सर्व कारणे आणि वस्तुस्थिती विचारात घेऊन, शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, “एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना बदली अनुज्ञेय राहणार नाही.”
केंद्र शासनाने दिलेल्या अभिप्रायानुसार, अंगणवाडी कर्मचारी हे ‘honorary workers’ (मानसेवी कर्मचारी) असून, त्यांच्यासाठी कोणतेही जिल्हा किंवा राज्यस्तरीय कॅडर (Cadre) नाही, ज्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची बदली (Free Transferability) अनुज्ञेय नाही.
केंद्र शासनाची मार्गदर्शक तत्त्वे
केंद्र शासनाच्या “Mission Saksham Anganwadi and Poshan 2.0” मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अंगणवाडी कर्मचारी स्थानिक समुदायातून निवडलेले ‘मानसेवी कार्यकर्ते’ (Honorary Workers) आहेत, जे अर्धवेळ सेवा देतात.
केंद्र शासनाने भरती, बदली, पोस्टिंग यासंबंधी कोणतीही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नाहीत, कारण योजनेच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे.
तथापि, केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे त्यांच्या स्थानिक / जवळपासच्या भागातच (Local / Nearby Areas) कार्यरत असणे आवश्यक आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत शासन निर्णयातील माहितीवर अवलंबून राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बदली बाबतचा अधिकृत शासन निर्णय डाउनलोड करा




