BSc Agri Direct Second Year Admission 2025 राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) या संदर्भात एक जाहीर सूचना (क्रमांक १) प्रसिद्ध केली आहे.
BSc Agri Direct Second Year Admission 2025
प्रवेश प्रक्रिया तपशील
- अभ्यासक्रमाचे नाव: बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी) चे थेट द्वितीय वर्ष.
- कालावधी: हा अभ्यासक्रम ३ वर्षांचा (६ सत्र) असेल.
- श्रेयांक भार: या अभ्यासक्रमासाठी १३८ श्रेयांक भार असेल.
- सुरुवात: ही प्रवेश प्रक्रिया २८ मे, २०२५ पासून सुरु झाली आहे.
- अंतिम दिनांक: ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ११ जून, २०२५ आहे.
- कोण अर्ज करू शकतात? महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांमध्ये, म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) अंतर्गत येणाऱ्या कृषी तंत्रनिकेतनमधून ३ वर्षांचा इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- शैक्षणिक पात्रता:
- खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पदविकेमध्ये किमान ६०% एकत्रित श्रेयांक सरासरी गुण (CGPA) असणे आवश्यक आहे.
- आरक्षित प्रवर्गातील (अ.जा./ अ.ज. / वि.जा. / भ.ज. (ब) / भ.ज. (क) / भ.ज. (ड) / इमाव / विमाप्र / सा. व शै. मा. व. / आ.दु.घ. / दिव्यांग / अनाथ) विद्यार्थ्यांसाठी किमान ५०% एकत्रित श्रेयांक सरासरी गुण (CGPA) आवश्यक आहे.
- माहिती पुस्तिका: प्रवेशासंबंधित सविस्तर माहिती असलेली पुस्तिका २८ मे, २०२५ पासून CET Cell च्या अधिकृत वेबसाईट http://www.mahacet.org वर उपलब्ध आहे.
ही प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी cetcell@mahacet.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकतात किंवा ०२२-२२०१६१५९ या दूरध्वनी क्रमांकावर चौकशी करू शकतात.
Notice Regarding Admission Process of B.Sc. (Agri.) for A.Y. 2025-26
Admission Portal For A.Y.2025-26 : https://cetcell.mahacet.org/cap-_2025-26/
