गेल्या काही वर्षांपासून ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग कामगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत सरकारने Gig Kamgar eShram Portal yojana आणली आहे. आता गिग कामगारांसाठी ‘ई-श्रम पोर्टल’ सुरू केले असून, या पोर्टलवर नोंदणी केल्यास विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
गिग कामगार म्हणजे कोण?
गिग कामगार म्हणजे सैल स्वरूपात (freelance किंवा टास्क बेस्ड) काम करणारे लोक – उदाहरणार्थ:
- झोमॅटो/स्विगीचे डिलिव्हरी बॉयज
- उबेर/ओला ड्रायव्हर्स
- अॅपवरून टास्क पूर्ण करणारे फ्रीलांसर
Gig Kamgar eShram Portal yojana – ई-श्रम पोर्टलवर नोंदणी
कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टल वर गिग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जात आहे. या नोंदणीमुळे सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवता येणार आहे.
नोंदणीचे मुख्य फायदे:
- सरकारी योजना व विमा संरक्षणाचा थेट लाभ
- आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक
- औपचारिक ‘वर्कर ID’ निर्माण होते
- अपघाती विमा, निवृत्ती फंड, आरोग्य योजना, अपंगत्व सहाय्य योजना इ.साठी पात्रता
कोण करू शकतो नोंदणी?
✅ झोमॅटो, स्विगी, ओला, उबेर इ. वर काम करणारे डिलिव्हरी बॉय, ड्रायव्हर
✅ असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगार
✅ फ्रीलांसर, टास्क-आधारित काम करणारे व्यक्ती
✅ प्लॅटफॉर्म आधारित व्यवसाय करणारे तरुण
नोंदणी कशी कराल?
🖥️ पोर्टल लिंक:
👉 http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला)
- बँक खाते क्रमांक
🕐 नोंदणी प्रक्रिया: फक्त 5 ते 10 मिनिटांत पूर्ण!
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त नि.वा. नगरारे यांनी पत्रकाद्वारे गिग कामगारांना त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. शासकीय लाभांपासून कोणीही वंचित राहू नये, हा यामागचा उद्देश आहे.
निष्कर्ष
गिग कामगारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवणे सहज शक्य होणार आहे. सुरक्षित भविष्याची पायाभरणी आजच करा!