Aaple Sarkar Portal Update ‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी 5 दिवस बंद राहणार आहे. असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MAHAIT) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
Table of Contents
“आपले सरकार” या पोर्टलवर, विविध शासकीय सेवा मिळवण्यासाठी अर्ज करता येतात, जसे की उत्पन्न दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र , राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र , ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच इतर प्रकारच्या सेवांचा समावेश आहे. विविध प्रमाणपत्रे, दाखले, आणि इतर सेवांसाठी अर्ज करणे, तसेच अर्जाची स्थिती तपासणे, आणि तक्रार निवारण यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
लोकसेवा प्राप्त करण्यासाठी ‘आपले सरकार’ (aaplesarkar.mahaonline.gov.in) या पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा आहे.
Aaple Sarkar Portal Update ‘या’ 5 दिवसासाठी बंद राहणार
‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी १० ते १४ एप्रिल, २०२५ अशी पाच दिवस बंद राहील. या कालावधीत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी कृपया या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
अधिक माहितीसाठी : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/