KVS Lottery Result Date 2025 26: केंद्रीय विद्यालयांमध्ये बालवाटिका-1 आणि 3 प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारीख 24 मार्च 2025 (रात्री 10:00 पर्यंत) वाढवण्यात आली होती. आता या प्रवेशाची Lottery Result New Date जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत सूचना kvsangathan.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
Table of Contents
KVS Lottery Result Date 2025 26
Kendriya Vidyalaya Lottery Result: केंद्रीय विद्यालयांमध्ये बालवाटिका-1 आणि 3 प्रवेशाच्या KVS 1st Class Lottery Result Date 2025 26 ही 26 मार्च 2025 रोजी नियोजित होती. मात्र आता लॉटरी प्रक्रिया 28 मार्च 2025 रोजी काढण्यात येणार आहे. खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
KVS Lottery Result New Time Table 2025 26
प्रदेशाचे नाव | लकी ड्रॉ वेळ |
---|---|
मुंबई, गुवाहाटी, सिलचर, तिनसुकिया | सकाळी 8:30 – 9:30 |
दिल्ली, हैदराबाद, वाराणसी, रायपूर | सकाळी 9:30 – 10:30 |
अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, डेहराडून | सकाळी 10:30 – 11:30 |
आग्रा, भुवनेश्वर, कोलकाता, रांची | सकाळी 11:30 – 12:30 |
चंदीगड, एर्नाकुलम, गुरुग्राम, जयपूर | दुपारी 12:30 – 1:30 |
चेन्नई, जबलपूर, जम्मू, लखनौ, पटणा | दुपारी 2:00 – 3:30 |
इतर वेळापत्रक आणि सूचना पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच राहतील. संबंधित केंद्रीय विद्यालयांना या सुधारित वेळापत्रकाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ही महत्त्वाची माहिती संबंधित प्रादेशिक कार्यालय आणि केंद्रीय विद्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
