मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना eKYC नवीन अपडेट

Published On: February 7, 2026
Follow Us
Ladki Bahin Maharashtra Ekyc

महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Maharashtra Ekyc) राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. या योजनेत सातत्य आणि संपूर्ण पारदर्शकता यावी, तसेच लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळत राहावा यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेसाठी eKYC करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

e-KYC करण्याची अंतिम मुदत: 31 मार्च 2026

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी.

अंतिम मुदत आता 31 मार्च 2026 आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील आर्थिक लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!

e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री यांनी केले आहे.

ई-केवायसी प्रक्रिया आहे खूप सोपी!

मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही कमी वेळात ती पूर्ण करू शकतात.

ई-केवायसीसाठी संकेतस्थळ: योजनेच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्या – https://ladakibahin.maharashtra.gov.in

प्रक्रिया: या प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) केले जात आहे, जेणेकरून योजनेच्या लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल.आत्तापर्यंत अनेक लाभार्थी भगिनींनी ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

तांत्रिक अडचणींवर तातडीने उपाययोजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत काही लाभार्थ्यांना येणाऱ्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी ३० ऑक्टोबर रोजी मंत्रालयात एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्यावर भर देण्यात आला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ तुम्हाला सातत्याने मिळत राहावा यासाठी, मुदत संपण्यापूर्वीच आपले ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करा! ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, ही आपल्यासाठी एक छोटीशी कृती आहे, पण यामुळे सरकारला योजनेत पारदर्शकता राखण्यास मदत होईल आणि आपल्याला वेळेवर आर्थिक लाभ मिळत राहतील.

पुन्हा एकदा लक्षात घ्या: ३१ मार्च २०२६ पूर्वी e-KYC पूर्ण करणे महत्त्वाचे आहे!

Ladki Bahin Maharashtra Ekyc Process

सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या Website ला भेट द्यावी. मुखपृष्ठावरील eKYC Banner वर Click करावे.

त्यानंतर eKYC फॉर्म उघडेल. लाभार्थींनी आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक कोड (Captcha) नमूद करावा. तसेच, आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून Send OTP बटणावर Click करावे.

यामुळे आपले eKYC या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. जर eKYC आधीच पूर्ण झाली असेल, तर “eKYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश प्राप्त होईल.

जर eKYC पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही, तपासला जाईल. जर आधार क्रमांक मंजूर यादीत नसेल, तर “आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही” असा संदेश प्राप्त होईल.

जर आधार क्रमांक मंजूर यादीत असेल (होय), तर लाभार्थ्याच्या (Aadhar linked) मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून Submit बटणावर Click करावा.

यानंतर eKYC पृष्ठावर पती/वडील यांचा आधार क्रमांक नमूद करुन पडताळणी संकेतांक कोड (Captcha) नमूद करावा. तसेच, आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून Send OTP बटणावर Click करावे. नंतर पती/वडील यांच्या (Aadhar linked) मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून Submit बटणावर Click करावा.

या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडावा. तसेच, खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्यात:

“माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत”.

“माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला लाभ घेत आहे? (होय / नाही)”.

शेवटी, चेक बॉक्स Click करुन Submit बटणावर क्लिक करावे. यानंतर “Success तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पुर्ण झाली आहे” असा संदेश येईल.

e-KYC Online Ladki Bahin Yojana

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment