Ladki Bahin Yojana Loan Scheme: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात येत आहे. आता राज्यात प्रथमच KDCC बँकेकडून ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पात्र महिलांना 30,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती पाहूया.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Loan Scheme
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (KDCC) बँकेने एक अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त अशी ‘ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना’ सुरू केली आहे. या योजनेतून महिलांना तीन वर्षांसाठी रु.३०,००० पर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
या उपक्रमामुळे महिलांना छोटा व्यवसाय सुरू करता येईल, गरजेच्या वस्तू खरेदी करता येतील, किंवा दैनंदिन आर्थिक अडचणींवर मात करता येईल – तेही अत्यंत माफक व्याजदराने.
कर्ज योजनेची ठळक वैशिष्ट्ये
वैशिष्ट्य | तपशील |
---|---|
👉 कर्ज रक्कम | ₹३०,००० पर्यंत |
👉 कालावधी | ३ वर्षे |
👉 व्याजदर | १०% वार्षिक |
👉 हप्ता आकारणी | मासिक ₹९६८ |
👉 परतफेड पद्धत | ‘लाडकी बहिण’ योजनेतील ₹१,५०० हप्त्यातून थेट कपात |
👉 लाभार्थी | कोल्हापूर जिल्ह्यातील १.३८ लाख महिलांना लाभ |
कोण पात्र आहेत?
‘लाडकी बहिण योजना’ ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, रु.२.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा रु.१,५०० आर्थिक सहाय्य दिले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील १,३८,१५८ महिलांचे खाते केडीसीसी बँकेत आहे, ज्या या नव्या कर्ज योजनेच्या थेट लाभार्थी ठरणार आहेत.
या बँकेकडून लाडकी बहीण योजनेतून मिळणार 25 हजार पर्यंतचे कर्ज!
बँकेचा उद्देश आणि समाजाभिमुख दृष्टिकोन
बँकेने ही योजना जाहीर करताना स्पष्ट केलं आहे की, “आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सावकारीच्या विळख्यातून मुक्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे हे आमचे ध्येय आहे. महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांमधून उच्च व्याजदराने कर्ज घ्यावे लागू नये, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.”
ही योजना खास करून स्वतःचा लघु उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग
‘लाडकी बहिण’ ही योजना महिलांना मासिक रु.१५०० ची रक्कम देऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल घडवते. मात्र, ती रक्कम एकटीपुरती पुरेशी नसल्याने KDCC बँकेने हा “मुल्यवर्धित” कर्ज पर्याय सादर केला आहे.
हा निर्णय केवळ बँकिंग उपक्रम नाही, तर समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन आहे.
अधिक माहितीसाठी KDCC बँकेच्या वेबसाईटला भेट द्या: https://kdccbank.com/