मोठी अपडेट! लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्त्याची तारीख जाहीर Ladki Bahin Yojana April Installment Date

Published On: May 2, 2025
Follow Us
Ladki Bahin Yojana April Installment Date

Ladki Bahin Yojana April Installment Date: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेत असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. एप्रिल महिन्याचा हप्ता (April Installment) लवकरच जमा होणार आहे. सन 2025 26 या वर्षाच्या आर्थिक खर्चासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचा शासन आदेश दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तसेच दिनांक 2 मे 2025 पासून एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..

लाडकी बहीण योजना: या महिलांना मिळतो लाभ!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुधारित नियमानुसार आता खालील निकष पूर्ण करणाऱ्या पात्र लाभार्थी महिलांना Ladki Bahin योजनेचा लाभ मिळणार आहे.

  1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  2. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  3. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  4. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

या महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता?

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत, त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. यामध्ये खालील महिला समाविष्ट आहेत.

  • इतर सरकारी योजना लाभार्थी: दरमहा ₹1500 किंवा त्याहून अधिक लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • संजय गांधी निराधार योजना लाभार्थी: संजय गांधी योजनेच्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेतील 2.30 लाख महिलांना अपात्र घोषित केले आहे.
  • चारचाकी वाहन: ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणाकडे चारचाकी वाहन असल्यास अशा महिलांना देखील यापुढे लाभ मिळणार नाही.
  • नमोशक्ती योजना लाभार्थी: 1.60 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले.
  • 65 वर्षांवरील महिला: 1.10 लाख महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवले आहे.
  • आंतरराज्य विवाह, आधार-बँक खाते विसंगती: ज्या महिलांचे आधार कार्ड व बँक खात्यातील नाव वेगळे आहे किंवा दोन अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला थेट खात्यात जमा होणार? | Ladki Bahin Yojana April Installment Date

महाराष्ट्र राज्य सरकारने (जून 2024) मध्ये Ladki Bahin Yojana सुरू केली आहे. महिला दिनांच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात 8 मार्च रोजी जमा करण्यात आले आहे. आता पात्र महिलांना पुढील Ladki Bahin Yojana April Installment Date कधी जमा होणार? याबाबत उत्सुकता लागली आहे.

Ladki Bahin Yojana April Installment Date New Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया दिनांक 2 मे 2025 पासून सुरू करण्यात आली आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.

या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

1 एप्रिल पासून आता नवीन आर्थिक वर्ष 2025-26 सुरू झाले आहे. या वर्षासाठी 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 मध्ये ₹2829 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यापैकी प्रत्यक्ष ₹2511 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता शासन मान्यता देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी शासन आदेश येथे पाहा

‘रूपे कार्ड’ ची सुविधा

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ‘रूपे कार्ड’ सुरू केले आहे. या कार्डद्वारे महिलांना डिजिटल पेमेंट, विमा संरक्षण आणि QR कोड पेमेंटसह विविध सुविधा मिळतील. हे कार्ड छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे, जे महिलांसाठी विशेष कार्ड जारी करत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत अपडेट्ससाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ‘सुधारित’ शासन निर्णय सविस्तर संपूर्ण माहिती

लाडकी बहीण योजनेच्या 15 हजारहून अधिक महिला पात्र – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment