Ladki Bahin Yojana e-KYC “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारकडून e-KYC करणं बंधनकारक. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि डेडलाईन.
Ladki Bahin Yojana e-KYC संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतील पात्र महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी आता e-KYC (आधार प्रमाणीकरण) करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या महिलांनी अद्याप e-KYC पूर्ण केले नाही, त्यांना लवकरात लवकर ते पूर्ण करणे आवश्यक आहे.
e-KYC करण्याचे कारण काय?
ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (Direct Benefit Transfer) जमा केला जातो. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी शासनाने आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) अनिवार्य केले आहे.
यासाठी, दरवर्षी जून महिन्यात सर्व लाभार्थ्यांचे e-KYC करणे आवश्यक आहे. महिला व बाल विकास विभागाला UIDAI ने Sub-AUA/Sub-KUA म्हणून नियुक्त केले आहे, ज्यामुळे विभागाला Aadhaar Authentication करण्याची अधिकृतता मिळाली आहे.
e-KYC करण्याची प्रक्रिया
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी e-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि सोपी आहे. तुम्ही खालील लिंकवर जाऊन ती पूर्ण करू शकता:
- सर्वात आधी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवरील eKYC Banner वर क्लिक करा.
- eKYC फॉर्म मध्ये तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
- त्यानंतर तुमच्या आधार-लिंक्ड मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून सबमिट करा.
- जर तुम्ही विवाहित असाल, तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या OTP ने प्रमाणीकरण पूर्ण करा.
- त्यानंतर तुमची जात श्रेणी निवडा आणि काही घोषणेतील माहिती (declaration) प्रमाणित करा.
- ही सर्व माहिती योग्य भरल्यास, तुम्हाला “Success” चा संदेश दिसेल.
यावर्षीची डेडलाईन: या परिपत्रकाच्या तारखेपासून (१८ सप्टेंबर २०२५) पुढील २ महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. जे लाभार्थी या काळात e-KYC पूर्ण करणार नाहीत, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी अपात्र ठरवले जाईल.
महत्त्वाचे मुद्दे
- डेडलाईन: चालू आर्थिक वर्षासाठी १८ सप्टेंबर २०२५ पासून दोन महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
- वार्षिक बंधन: यापुढे दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व लाभार्थ्यांना e-KYC करणे बंधनकारक असेल.
- महत्त्वाची सूचना: e-KYC न केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील लाभांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करा.
अधिक माहितीसाठी : शासन आदेश येथे पाहा