महाराष्ट्रातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी २०२६ च्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. शासनाकडून २३ फेब्रुवारी २०२६ पासून तांत्रिक वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील २ ते ३ दिवसांत पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.
अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे – Ladki Bahin Yojana January 2026 पैसे कधी जमा होणार? यासंदर्भात महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून टप्प्याटप्प्याने DBT प्रणालीद्वारे रक्कम खात्यात जमा होत आहे.
लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता 2026: खात्यात पैसे कधी येणार?
- योजना: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
- हप्ता: ₹1500 (जानेवारी २०२६)
- वितरण सुरू: २३ फेब्रुवारी २०२६
- पद्धत: DBT (Direct Benefit Transfer)
- लाभार्थी वयोगट: २१ ते ६५ वर्षे
अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की, Ladki Bahin Yojana January 2026 पैसे कधी जमा होणार? तर याचं उत्तर अतिशय स्पष्ट आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २३ फेब्रुवारीपासून १५०० रुपयांच्या या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे.
प्रशासकीय आणि बँकिंग प्रक्रियेनुसार येत्या २ ते ३ दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये हा सन्मान निधी (Ladki Bahin Yojana January Installment 2026) जमा होईल. त्यामुळे आता लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता तारीख निश्चित झाली असून, लाभार्थ्यांनी आपले बँक खाते किंवा पासबुक तपासत राहावे.
लाडकी बहीण योजना या लाभार्थी महिलांना e-KYC मधून सूट; शिफारस नमूना पत्र डाउनलोड करा
e-KYC सुधारणा: ३१ मार्च २०२६ पर्यंत शेवटची सुवर्णसंधी
काही लाख महिलांचे हप्ते e-KYC अपूर्ण असल्यामुळे किंवा फॉर्म भरताना चुकीचे पर्याय (उदा. नाव, पत्ता, उत्पन्नाची माहिती किंवा कुटुंबातील सदस्य) निवडल्यामुळे थांबले आहेत. अशा महिलांसाठी शासनाने e-KYC सुधारणा करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली आहे.
ही तुमची शेवटची संधी आहे. मुदतीत त्रुटी दूर केल्यानंतर पडताळणी होईल आणि त्यानंतरच तुमचे रखडलेले आणि चालू हप्ते (Ladki Bahin Yojana January Installment 2026) नियमितपणे मिळण्यास सुरुवात होईल.
लाडक्या बहीण ई-केवायसी संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित
ऑनलाइन e-KYC किंवा दुरुस्ती कशी करावी?
कोणत्याही कार्यालयात चकरा न मारता तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून अत्यंत सोप्या पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- वेबसाइटवर जा: सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर (ladakibahin.maharashtra.gov.in) जा तिथे थेट e-KYC बॅनर लिंकवर क्लिक करा.
- माहिती भरा: लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा Captcha कोड काळजीपूर्वक टाका.
- संमती द्या: आधार प्रमाणीकरणासाठी असलेल्या संमती (Consent) बॉक्सवर टिक करा आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा.
- OTP टाका: तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकून सबमिट करा.
- स्टेटस तपासा: जर तुमची e-KYC आधीच पूर्ण असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.
- जर माहिती अपूर्ण किंवा चुकीची असेल, तर तुम्हाला सुधारणा (Edit/Correction) करण्याचा पर्याय दिसेल.
- दुरुस्ती करा: तुमची चुकीची माहिती दुरुस्त करा. आवश्यकतेनुसार रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा निवास प्रमाणपत्र अपलोड करा आणि फॉर्म Submit करा.
(नोंद: यशस्वी सबमिशननंतर कन्फर्मेशन SMS येईल. प्रशासनाकडून पडताळणी झाल्यानंतर तुमचे हप्ते सुरू होतील, यासाठी काही आठवडे लागू शकतात.)
लाडकी बहीण योजना : e-KYC अंतिम मुदत वाढली! या अधिकृत वेबसाईटवर लगेच e-KYC करा
योजनेची सद्यस्थिती आणि आकडेवारी
२१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये DBT द्वारे देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ही योजना राज्यासाठी महत्वाची ठरली आहे.
- पोर्टलवर प्राप्त एकूण अर्ज: सुमारे १.१२ कोटी
- मंजूर झालेले अर्ज: सुमारे १.०६ कोटी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठा आधार ठरत आहे.
तुम्हाला या प्रक्रियेत काही अडचण येत असल्यास किंवा तुमचा अर्ज नेमका कोणत्या टप्प्यावर आहे हे तपासायचे असल्यास, तुम्ही अधिकृत पोर्टलवर लॉगिन करू शकता किंवा ‘१८१’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
अधिक माहितीसाठी: https://ladakibahin.maharashtra.gov.in/







