लाडकी बहीण योजना: ई-केवायसी करूनही पैसे जमा झाले नाहीत? तुमच्या अर्जात झाल्या आहेत ‘या’ 3 मोठ्या चुका! 

Published On: January 20, 2026
Follow Us
Ladki Bahin Yojana e KYC mistakes payment stopped reasons

सध्या राज्यभरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा आहे. अनेक भगिनींच्या खात्यात नियमित हप्ते जमा होत आहेत, पण त्याच वेळी हजारो महिला अशा आहेत ज्यांनी Ladki Bahin Yojana e KYC पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत किंवा अचानक हप्ते येणे बंद झाले आहे.

तुम्ही पात्र असूनही तुमचे नाव का कापले गेले? यामागे नक्की काय तांत्रिक कारण आहे? या आर्टिकलमध्ये आपण नेमक्या त्याच चुका पाहणार आहोत, ज्यामुळे अनेक भगिनी लाभापासून वंचित राहिल्या आहेत. सविस्तर पाहूया.

Ladki Bahin Yojana e KYC करताना नक्की कुठे गडबड झाली?

नुकताच राज्य सरकारने माहे डिसेंबर 2025 चा लाडकी बहीण योजनेचा दरमहा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. यादरम्यान पुणे, छ. सांभाजीनगर, गडचिरोली, बीड आणि यासारख्या अनेक जिल्ह्यांमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने हजारो अर्ज ‘अपात्र’ ठरले आहेत. घाईगडबडीत किंवा माहितीच्या अभावामुळे प्रामुख्याने खालील 3 मोठ्या चुका झाल्याचे दिसून येत आहे.

1. सरकारी नोकरीबाबतचा प्रश्न (The Government Job Confusion)

ई-केवायसी करताना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो: माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत (होय / नाही)

चूक काय झाली?: अनेक महिलांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नसतानाही, प्रश्नाचा अर्थ न समजल्याने किंवा सायबर कॅफे चालकाच्या घाईमुळे ‘होय’ (Yes) हा पर्याय निवडला गेला. त्यामुळे या योजनेच्या DBT सिस्टीमने तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील समजून थेट अपात्र ठरवले असल्याची शक्यता आहे.

2. वार्षिक उत्पन्नाचा गट (Income Group Selection)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

चूक काय झाली?: अर्ज भरताना उत्पन्नाचा गट निवडताना अनेकदा चुकीचा गट निवडला गेला. किंवा काही ठिकाणी उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) स्पष्टपणे अपलोड न करता केवळ माहिती भरली गेली. त्यामुळे उत्पन्नाची अट पूर्ण होत नसल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात असल्याची शक्यता आहे.

3. कुटुंबातील इतर लाभार्थी (Other Beneficiaries)

एका कुटुंबातील किती महिला लाभ घेत आहेत, या प्रश्नावरही मोठा गोंधळ उडाला.

चूक काय झाली? माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. (होय / नाही ) या प्रश्नाचे उत्तर देताना संदिग्धता निर्माण झाली. त्यामुळे माहितीतील विसंगतीमुळे (Data Mismatch) अर्ज बाद असल्याची शक्यता आहे.

सायबर कॅफे आणि नेटवर्कचा फटका

यामध्ये फक्त महिलांचीच चूक आहे असे नाही, तर ई-सेवा केंद्र (Setu Kendra) आणि नेट कॅफेवरील गर्दीचाही मोठा फटका बसला आहे.

सायबर कॅफे वर Ladki Bahin Yojana e KYC करताना ऑपरेटरकडून योग्य माहिती न घेताच महिलांना प्रश्न न विचारताच स्वतःच्या मनाने उत्तरे भरली गेली असल्याची शक्यता आहे. तसेच केवळ माहिती भरली, पण मूळ कागदपत्रे (उदा. हमीपत्र, आधार कार्ड) स्पष्टपणे स्कॅन करून अपलोड केली नाहीत. घाईत भरलेले हे अर्धवट अर्ज मुंबई स्तरावरील तपासणीत (Scrutiny) बाद ठरवले गेले.

सर्वात मोठी अडचण: ‘Edit’ ऑप्शन गायब!

सध्याच्या घडीला सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे Ladki Bahin Yojana e KYC किंवा अर्ज एकदा सबमिट (Submit) झाल्यानंतर त्यात दुरुस्ती (Correction/Edit) करण्यासाठी कोणताही पर्याय पोर्टलवर उपलब्ध नाही.

ज्या महिलांचे अर्ज या तांत्रिक चुकांमुळे बाद झाले आहेत, त्यांना आपली चूक सुधारण्याची संधी मिळत नाहीये. प्रशासकीय स्तरावर अद्याप कोणतीही अधिकृत हेल्पलाइन (Helpline) किंवा तक्रार निवारण कक्ष स्पष्टपणे कार्यरत नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण आहे.

Ladki Bahin Yojana e KYC आता पुढे काय?

जरी सध्या ‘Edit’चा पर्याय नसला, तरी इतक्या मोठ्या संख्येने अर्ज बाद झाल्यामुळे सरकारला लवकरच दुरुस्तीची संधी (Correction Window) द्यावी लागेल किंवा अपात्र अर्जांची पुन्हा पडताळणी करावी लागेल.

जर भविष्यात कॅम्प किंवा दुरुस्तीची संधी मिळाली, तर तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि हमीपत्र अचूक आणि तयार ठेवा. तसेच  तुमच्या अर्जाचे स्टेटस पोर्टलवर किंवा ॲपवर वारंवार तपासत राहा. कारण प्रशासनाकडून कधीही नवीन अपडेट येऊ शकते.

लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सक्षम करणे हा आहे, पण तांत्रिक क्लिष्टतेमुळे (Technical Glitches) अनेक गरजू महिला लाभापासून वंचित आहेत. Ladki Bahin Yojana e KYC प्रक्रियेतील या त्रुटी लवकरात लवकर दूर करून सरकारने महिलांना दिलासा देणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment