Ladki Bahin Yojana Installment मे महिन्याचा 11 वा हप्ता ‘या’ आठवड्यात येणार? काय आहे नवीन अपडेट सविस्तर वाचा

Published On: May 18, 2025
Follow Us
Ladki Bahin Yojana Installment

Ladki Bahin Yojana Installment उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या ७ लाख ७४ हजार १४८ महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात येत आहे. काय आहे नवीन अपडेट सविस्तर वाचा

लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित | Ladki Bahin Yojana Installment

दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.

त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७ लाख ७४ हजार १४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.

एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली असून, विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.

तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे. असे त्यांनी ट्वीट करत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी येणार – Ladki Bahin Yojana May Installment Date

मुख्यमंत्री माझी Ladki Bahin Yojana Installment May महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत सध्या पात्र लाडक्या बहिणी वाट पाहत असून, याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.

आतापर्यंत या योजनेचे १० हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत. राज्य सरकार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात (डीबीटीद्वारे) देत असते. एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता नुकताच जमा झाला होता. आता महिलांना ११वा हप्ता मिळणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून योजनेचे पैसे साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये किंवा त्यानंतर लगेच जमा होत आहेत. याच पद्धतीनुसार, मे महिन्याचा ११वा हप्ता देखील येत्या आठवड्यात म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, हे लक्षात ठेवावे की, या संदर्भात सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे, महिलांनी आपल्या बँक खात्यांवर लक्ष ठेवावे, पण अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment