MAH CET Notice महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) MAH-BCA/BBA/BMS/BBM-CET-2025 (Additional CET) २०२५ या प्रवेश परीक्षेसंबंधी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ही परीक्षा शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
MAH CET Notice
दिनांक 14 जुलै रोजी cetcell.mahacet.org या अधिकृत सीईटी सेलच्या वेबसाईटवर MAH-BCA/BBA/BMS/BBM-CET-2025 संदर्भात जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रवेशपत्र कधी मिळेल?
- उमेदवारांना १३ जुलै २०२५ रोजी त्यांच्या लॉगिनमध्ये परीक्षेच्या जिल्ह्याचे नाव असलेले प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- परीक्षा केंद्राचे नाव आणि संपूर्ण पत्ता असलेले अंतिम प्रवेशपत्र १६ जुलै २०२५ रोजी उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल. (MAH CET Admit Card)
सर्व उमेदवारांनी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने केले आहे.
अधिक माहितीसाठी, उमेदवार CET कक्षाच्या अधिकृत वेबसाइट http://www.mahacet.org ला भेट देऊ शकतात किंवा cetcell@mahacet.org या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.
