Maha CET Admissions Extended महाराष्ट्र सीईटी सेलने (राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जुलै २०२५ रोजी संपली होती.
मात्र, अनेक उमेदवार, पालक आणि संस्थांनी सीईटी सेलशी संपर्क साधून मुदतवाढीची विनंती केली होती. उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, सीईटी सेलने आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे.
सीईटी सेलने स्पष्ट केले आहे की, ही अंतिम मुदतवाढ असून यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी १४ जुलै २०२५ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.
अधिक माहितीसाठी, उमेदवार सीईटी सेलच्या https://cetcell.mahacet.org/ अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा ०२२-२२०१६१५९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ई-मेलसाठी cetcell@mahacet.org या पत्त्यावर संपर्क साधता येईल.










