Mahajyoti Free Tab Date Extended महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) द्वारे आयोजित JEE/NEET/MHT-CET 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जुलै २०२५ होती.
मात्र, अकरावी विज्ञान शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत असल्याने, विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. विद्यार्थ्यांची ही विनंती विचारात घेऊन, महाज्योतीने अर्ज सादर करण्यासाठी आणि यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जांमध्ये दुरुस्ती (वैध नॉन-क्रिमिलेअर, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे) करण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाज्योती संस्थेने केले आहे.
अधिक माहितीसाठी:
- महाज्योती संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत करण्यात आली आहे.
- संस्थेचे कार्यालय नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंद पेठ, नागपूर ४४० ०२२ येथे आहे.
- संपर्क क्रमांक: ०७१२-२८७०१२०-२१
- ई-मेल: mahajyotingp@gmail.com
- ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
